किमान तापमान : 30.02° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 2.46 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.48°से. - 31.19°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.76°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.88°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.49°से. - 30.23°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.3°से. - 30.25°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर साफ आकाश25.38°से. - 29.76°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर छितरे हुए बादल=२० तरुण चेहर्यांना संधी=
नवी दिल्ली, [२० जानेवारी] – दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याला दोन दिवसांचा अवधी उरला असताना भाजपाने आपल्या ६२ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. भाजपाने आपल्या यादीत २० तरुण चेहर्यांना संधी दिली आहे, तसेच २६ विद्यमान आमदारांवर पुन्हा विश्वास टाकला आहे.
आम आदमी पार्टीने सर्वात आधी आपले उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर कॉंग्रेसचे उमेदवार जाहीर झाले. भाजपाने आपल्या उमेदवारांची नावाची घोषणा सर्वांत शेवटी केली. आता फक्त भाजपाच्या चार उमेदवारांच्या नावाची घोषणा होणे बाकी आहे. भाजपाने आपल्या ३१ पैकी २६ विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारांच्या यादीत ६ महिलांचाही समावेश आहे.
यात किरण बेदी, कृष्णा तीरथ, नुपूर शर्मा, रेखा गुप्ता, किरण वैद्य आणि रजनी अब्बी यांचा समावेश आहे. दिल्ली विधानसभेत अनुसूचित जातीसाठी १२ जागा राखीव असताना भाजपाने अनुसूचित जातीच्या १३ जणांना उमेदवारी दिली आहे. राजधानीत दलितांची जवळपास २५ लाखे मते आहेत. भाजपाच्या यादीत एका मुस्लिम उमेदवाराचाही समावेश आहे. मटिया महल मतदारसंघातून भाजपाने अंजुमन दहेलवी यांना उमेदवारी दिली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्रवेश केलेल्या आप आणि कॉंग्रेसमधील नेत्यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. यात किरण बेदी यांच्यासह कृष्णा तीरथ, विनोदकुमार बिन्नी आणि एम. एस. धीर यांचा समावेश आहे.
दिल्ली प्रदेश भाजपाचे अध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. माजी महापौर आरती मेहरा आणि प्रदेश महासचिव आशीष सूद यांचा पक्षाने जाहीर केलेल्या यादीत समावेश नाही. विशेष म्हणजे आपमधून भाजपात प्रवेश केलेल्या शाजिया इल्मी यांना नवी दिल्ली मतदारसंघात आपचे अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध लढवले जाईल, असा अंदाज होता. मात्र त्यांच्या नावाचा यादीत समावेश नाही. शाजिया इल्मी यांनी स्वत:च निवडणूक लढण्यास नकार दिला होता. दिल्लीत भाजपाने चार जागा अकाली दलासाठी सोडल्या आहेत. यातील दोन जागा अकाली दल आपल्या निवडणूक चिन्हावर लढणार आहे, तर उर्वरित दोन जागा भाजपाच्या कमळ चिन्हावर लढवणार आहेत.
विशेष म्हणजे ज्येष्ठ भाजपा नेते प्रो. जगदीश मुखी यांना लढवले जाणार नाही, असा अंदाज असताना त्यांना जनकपुरी मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी दिली आहे. याठिकाणी त्यांचा मुकाबला त्यांच्या जावयाशी म्हणजे सुरेशकुमार यांच्याशी आहे. सुरेशकुमार यांना कॉंग्रेसनने उमेदवारी दिली आहे. मागील वेळी अतिशय कमी मतांच्या फरकाने निवडणूक हरणार्या राजीव बब्बर (तिलकनगर), आझादसिंग (मुंडका), विजेंदर गुप्ता (नवी दिल्ली), सुमनकुमार गुप्ता (चांदनी चौक), जगदीश प्रधान (मुस्तफाबाद) आणि रजनी अब्बी (तिमरपूर) यांनाही भाजपाने यावेळी पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवले आहे.