किमान तापमान : 27.99° से.
कमाल तापमान : 28.18° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 3.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.96°से. - 30.14°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.06°से. - 30.88°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.63°से. - 31.01°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 29.92°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.35°से. - 30.07°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.17°से. - 29.52°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश=सीआरपीएफची योजना=
रायपूर, [२७ फेब्रुवारी] – माओवाद्यांकडून केल्या जाणार्या खोट्या प्रचाराला पायबंद घालण्याच्या आणि नक्षलग्रस्त भागांचा विकास करण्याच्या उद्देशाने केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आदिवासी समाजाची मदत घेणार आहे.
छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित सुकमा जिल्ह्यातील ७६ किमी लांबीच्या सुकमा-कोंटा मार्गाचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३० वर निर्माण कार्य सुरू आहे. या महामार्गामुळे जगदलपूर आणि विजयवाडा जोडले जाणार आहे. या रस्त्यामुळे आदिवासी संस्कृती नष्ट होणार असून, शहरी लोक आदिवासी समाजाच्या जमिनी हडपतील, असा अपप्रचार माओवादी करीत आहेत. रस्त्याच्या बांधकामासाठी येणार्या वाहनांनादेखील त्यांच्याकडून अडथळा निर्माण करण्यात येत आहे. दरम्यान, कोणतीही अनुचित घटना होऊ नये, यासाठी सीआरपीएफ सर्वतोपरी प्रयत्नशील आहे.
विकासकामांबाबत होत असलेल्या खोट्या प्रचारावर उपाय म्हणून जागोजागी होर्डिंग्ज लावून आदिवासींना जागरूक करण्यात येणार आहे. होर्डिंग्जवर या चौपदरी मार्गाचे चित्र दाखविण्यात येणार असून, गोंडी या आदिवासी भाषेत त्यावर सूचना लिहिण्यात येणार आहे. नक्षलप्रभावित सुकमा जिल्ह्यात आदिवासींचा पाठिंबा मिळविण्याचा सीआरपीएफचा उद्देश आहे. माओवाद्यांच्या अपप्रचाराला आळा घालण्याचा दृष्टीने अशा प्रकारचा प्रयत्न प्रथमच करण्यात येत आहे. रस्त्याचे बांधकाम लोकांसाठी आणि येणार्या पिढीसाठी किती फायदेशीर आहे, हे आदिवासींना पटवून देण्यात येणार आहे. रस्त्याचे बांधकाम सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी सीआरपीएफवर सोपविण्यात आली आहे.
माओवाद्यांनी विकासकामात कितीही अडथळे आणले तरी आता ते आदिवासी लोकांना चुकीच्या मार्गाने नेऊ शकणार नाहीत. कारण लोकांना शिक्षण, चांगल्या वैद्यकीय सेवा आणि दूरसंचार सुविधेची आवश्यकता आहे आणि विकासाशिवाय ते शक्य नाही, असे सीआरपीफच्या दुसर्या तुकडीचे कमांडंट डब्ल्यू. एन. प्रसन्ना यांनी सांगितले.