किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 44 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– भाजपाला सर्वाधिक ७५० पेक्षा अधिक जागा,
– अजित पवार गट दुसऱ्या स्थानी,
– महाविकास आघाडीची पीछेहाट,
– काटेवाडीत भाजपाचा शिरकाव,
मुंबई, (०७ नोव्हेंबर) – राज्यात रविवारी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा कौल आज सोमवारी समोर आला. यामध्ये अनेकांना त्यांच्या बालेकिल्ल्यात धक्का बसला. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये महायुती अव्वल ठरली, तर महाविकास आघाडीची पीछेहाट झाली. नागपूर, बारामतीसह अनेक गड महायुतीने काबीज केले. राज्यातील २,३५९ ग्रामपंचायतींच्या नव्या कारभारींची निवड करण्यासाठी रविवारी मतदान झाले होते. त्यानंतर सोमवार सकाळी साडेदहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली.
रात्री उशिरापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाने ७५० पेक्षा अधिक जागा मिळवल्या. त्या पाठोपाठ अजित पवार गटाने नंबर लावला. ३५० पेक्षा अधिक जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने वर्चस्व प्रस्थापित केले. त्याचप्रमाणे बारातमीचा गडही अजित पवारांनी राखला. त्याखालोखाल शिवसेनेने(एकनाथ शिंदे) २५० पेक्षा जास्त जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आणले. त्यामुळे १००० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा डंका वाजला.
पुण्यात अजित पवार अव्वल
पुणे जिल्ह्यातील २३१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. येथे अजित पवार गटाने यंदा बाजी मारली आहे. अजित पवार गटाने १०९ जागांवर विजय मिळवून वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यानंतर ३४ जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे. काँग्रेसने २५, शिवसेना १०, उद्धव ठाकरे गट १३, शरद पवार गट २७, इतर ११ अशा एकूण २२९ जागांवर विजय मिळवला आहे. २३१ पैकी दोन जागा रिक्त आहे. बारामती तालुक्यातील अजित पवारांच्या काटेवाडी ग्रामपंचायतीत अजित पवार गटाला घवघवीत यश प्राप्त झाले आहे. काटेवाडीत १६ पैकी १४ जागांवर अजित पवार गटाने बाजी मारली आहे. भाजपाने पहिल्यांदाच काटेवाडीत शिरकाव करून दोन जागा जिंकल्या आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाच अव्वल
छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण १६ जागांसाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यामध्ये भाजपला ४, शिंदे गटाला ३, ठाकरे गटाला १, अजित पवार गटाला ३ जागा मिळाल्यात. शरद पवार गटाला छत्रपती संभाजी नगरमध्ये खातेच उघडता आले नाही. बीडमधील माजलगाव तालुक्यातील ३२ पैकी २३ ग्रामपंचायतीवर आमदार प्रकाश सोळंके यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
काँग्रेसला ७२१ जागा : नाना पटोले
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसने आतापर्यंत ५८९ ग्रामपंचायतीवर विजयी झेंडा फडकवला आहे, तर १३२ ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांच्या स्थानिक आघाडीने विजय मिळवत एकूण ७२१ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीने एकूण १३१२ ग्रामपंचायतीत विजय मिळवत राज्यात आघाडी घेतली आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
अजित पवारांचा निर्णय जनतेने योग्य ठरवला : सुनील तटकरे
आम्ही घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केले गेले. मात्र, आज आलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून अजित पवार यांनी घेतलेला निर्णय जनतेनेच योग्य ठरवला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केली.