किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.47°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, (०७ नोव्हेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनात भाजपाची संपूर्ण देशात यशस्वी घौडदौड सुरू आहे. ‘पंचायत टू पार्लमेंट’ केवळ आणि केवळ आणि चप्पा-चप्पा भाजपा आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत ७५० हून अधिक जागा जिंकत भाजपाने राज्यात क‘मांक एकचे स्थान पटकाविले आहे, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील भाजपाच्या विजयावर आनंद व्यक्त केला.
राज्यातील महायुती सरकारच्या कामगिरीला सुद्धा हा राज्यातील जनतेने दिलेला सुस्पष्ट कौल आहे, असे सांगत ते म्हणाले, मु‘यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा मोठे यश या निवडणुकीत मिळाले. राज्यातील महायुतीने एकत्रितरीत्या १४०० हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये दणदणीत विजय संपादन केला आहे. राज्यातील जनतेवर त्यांच्या सरकारच्या काळात प्रचंड सूड उगविणार्या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची बेरीज केली, तरी त्याच्या दुप्पट यश एकट्या भाजपाला मिळाले आहे. महाराष्ट्रातील जनतेने आपला कौल दिला आणि तोही सुस्पष्ट दिला, त्यांचे खूप खूप आभार, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या विजयासाठी अहोरात्र परिश्रम करणार्या भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. तसेच, सतत प्रवास करणारे आणि कार्यकर्त्यांना प्रेरित करणारे आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही अभिनंदन! ठिकठिकाणचे खासदार, आमदार, पदाधिकारी, महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांचेही मी हार्दिक अभिनंदन करतो. नवनिर्वाचितांचे अभिनंदन करतानाच देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.