किमान तापमान : 28.62° से.
कमाल तापमान : 32.2° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 4.76 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
32.2° से.
27.38°से. - 33.99°से.
गुरुवार, 05 डिसेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 28.9°से.
शुक्रवार, 06 डिसेंबर छितरे हुए बादल26.74°से. - 28.42°से.
शनिवार, 07 डिसेंबर घनघोर बादल26.23°से. - 27.78°से.
रविवार, 08 डिसेंबर टूटे हुए बादल24.61°से. - 25.97°से.
सोमवार, 09 डिसेंबर टूटे हुए बादल23.16°से. - 25.8°से.
मंगळवार, 10 डिसेंबर छितरे हुए बादल– इसिसच्या अतिरेक्यांना मिळत होत्या सीरियातून सूचना,
– मात्र, त्याआधीच उधळून लावण्यात आला कट,
पुणे, (०८ नोव्हेंबर) – पुण्यात दहशतवादी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणार होते. यासाठी त्यांना थेट सीरियामधून सूचना मिळत होत्या. मात्र, त्याआधीच त्यांचा कट उधळून लावण्यात आला आहे. पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएने नुकत्याच पकडलेल्या दहशतवाद्याच्या चौकशीतून ही माहिती मिळाली आहे.
एनआयएने महम्मद शाहनवाझ आलम (रा. न्यू महमूदा हाऊस, हजारीबाग, झारखंड) याला काही दिवसंपूर्वी अटक केली होती. त्याच्या चौकशीत ही माहिती समोर आली. या दहशतवाद्याचा संबंध हा पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात असल्याचेही उघड झाले आहे. पुण्यात अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा संपर्कात शाहनवाझ आलम होता. पुणे पोलिसांनी कोथरूड येथे जुलै महिन्यात महम्मद इम्रान खान आणि महम्मद युनुस साकी याच्यासह शाहनवाझ आलमला दुचाकी चोरताना अटक केली होती. मात्र, त्यांनी दिलेल्या माहितीवरून संशय बळावल्याने त्यांच्या घराची झडती घेण्यात आली होती. यावेळी कोंढवा येथून शाहनवाझ हा पोलिसांच्या तावडीतून पळून गेला होता. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे.
एनआयएने त्याची चौकशी सुरू केली असून, पुण्यात साखळी बॉम्बस्फोट कींवा मोठा हल्ला करण्याचा त्याचा कट होता, असे तपासात पुढे आले आहे. दहशतवाद्यांना यासाठी थेट सीरियामधून सूचना मिळत असल्याची माहितीदेखील पुढे आली आहे. एनआयएने पुणे पोलिसांच्या कौतुकासाठी पत्र पाठवले आहे. या पत्रातून घातपाताच्या कटाची माहिती समोर आली आहे. या आरोपींनी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणा आणि इतरांसह अनेक राज्यांमध्ये देखील बॉम्बहल्ले करण्याची योजना आखली होती. हे सर्व आरोपी पुण्यात कोंढवा येथे राहत होते. ते इसिस या दहशतवादी संघटनेच्या सुफा या उपसंघटनेशी संबंधित होते. मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी, मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान दुचाकींमध्ये स्फोटके ठेवून घातपात करणार होते. खान, साकीकडून बनावट आधारकार्ड, ड्रोनचे साहित्य, काडतूस, पांढर्या रंगाच्या गोळ्या, पिस्तूल ठेवण्याचे चामडी पाकीट, इलेक्ट्रॉनिक वजन काटा जप्त करण्यात आला होता.