किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.6° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.6° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलमुंबई, (१६ नोव्हेंबर) – मनोज जरांगे यांना भेटून सांगितले होते की, असे आरक्षण कधीही मिळणार नाही. मुळात त्यांच्या मागे कोण आहे, कोण बोलायला सांगत आहेत, ज्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे जातीय तणाव होत आहेत, हे लवकरच समोर येईल, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी येथील पत्रपरिषदेत सांगितले. राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली तसेच अजित पवार आणि शरद पवार यांच्यावरही हल्लाबोल केला.
जात ही अनेकांना प्रिय असते, महाराष्ट्रात स्वतःच्या जातीबद्दल अभिमान असायचा. मात्र, दुसर्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात सुरू झाले. यांच्या स्वार्थापायी आपण महाराष्ट्र खड्ड्यात घालतोय्, माझ्यासाठी माणूस महत्त्वाचा असतो, मी जात-पात मानत नाही, असा हल्ला राज ठाकरे यांनी शरद पवारांवर केला.
मध्यप्रदेशमध्ये भाजपाने मतदारांना मोफत आयोध्यावारी घडवण्याचे आश्वासन दिले. त्यावरून राज ठाकरेंनी भाजपावर सडकून टीका केली. राज ठाकरे म्हणाले की, टूर अॅण्ड ट्रॅव्हल्स नावाचे नवीन खाते उघडणार आहेत, असे वाटतेय्, इतकी वर्षे जे काम केले, त्यावर निवडणुका लढवायला हव्यात. हवा आणि ध्वनिप्रदूषणामुळे न्यायालयाने दिवाळीत फटाके फोडण्याबाबत निर्देश दिला होता. त्यावर राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. आता फटाके कधी वाजवायचे, सण कसे साजरे करायचे हे न्यायालय ठरवणार का, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.