किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– राज्यपाल रमेश बैस यांचे आवाहन,
नंदुरबार, (१६ नोव्हेंबर) – इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे लोक त्यांच्या बोलीभाषेपासून दूर जात आहेत, आपल्या बोलीभाषा नाहीशा झाल्या, तर संस्कृती नष्ट होईल. म्हणून नवीन पिढीने मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषा शिकण्याबरोबरच आपल्या बोलीभाषा समृद्धपणे जोपासण्याचे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. नंदुरबार येथे बुधवारी राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिवस व आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, मदत व पुनर्वसन, आपत्ती मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील, खासदार डॉ. हिना गावित आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल रमेश बैस म्हणाले, स्वातंत्र्यानंतर प्रथमच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी समुदायांचे योगदान साजरे करण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी १५ नोव्हेंबर हा दिवस आदिवासी जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन-चार वर्षांपूर्वी चंद्रपूरच्या आश्रमशाळेतील पाच विद्यार्थ्यांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली होती. आमचे तरुण धनुर्विद्या आणि इतर खेळांमध्येही चांगली कामगिरी करीत आहेत.
सर्वांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवणार : मुख्यमंत्री
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व सर्व जाती-जमातींच्या विचारांचा आणि स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. आदिवासी बांधवांचा गौरव वाढवतानाच त्यांच्या विकासासाठी जनजातीय गौरव दिवस व सांस्कृतिक महोत्सवसार‘या अभियानाच्या रूपाने आणखी एक पाऊल पुढे टाकले जात आहे. त्यासाठी सर्वांचा विकास हे उद्दिष्ट ठेवून सुरू असलेले केंद्र सरकारचे काम आम्हाला निरंतर प्रेरणा देत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील आदिवासी बहुल जिल्ह्यात माहिती, शिक्षण आणि आजपासून सुरू झालेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या राज्यस्तरीय मोहिमेचा शुभारंभ राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हिरवी झेंडी दाखवून केला.