किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.47°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– सर्वपक्षीय बैठकीत निर्णय,
मुंबई, (०१ नोव्हेंबर) – मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने पूर्वी ज्या कारणांमुळे आणि त्रुटींमुळे रद्द केले होते, तसेच जी निरीक्षणे नोंदवली होती त्या सर्व त्रुटी आता नव्याने डेटा गोळा करताना होणार नाहीत, याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. यामुळे न्यायालयात टिकणारे असे आरक्षण मराठा समाजाला मिळू शकेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी व्यक्त केला.
मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर तत्काळ या संदर्भातील शासन आदेश काढण्यात आला असून, सर्व जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना कुणबी नोंदी असलेल्यांना तातडीने प्रमाणपत्रे देण्याचा निर्देश दिला आहे. मोडी लिपीतील आणि उर्दू भाषेतील कागदपत्रांचे वाचन करून, डिजिटाईझ करण्यासाठी व पब्लिक डोमेनवर आणून त्याआधारे कुणबी जात प्रमाणपत्र देण्यास सांगण्यात आले आहे.
परिपूर्ण डेटा गोळा करणार : फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील न्यायालयीन प्रक्रियेद्वारे मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलण्यात येतील तसेच राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून त्रुटी नसलेला, परिपूर्ण डेटा विहित कालावधीत गोळा करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी बीरेंद्र सराफ यांनी न्यायालयीन प्रक्रियेबाबत माहिती दिली. प्रारंभी सामाजिक न्याय विभागाचे सचिव भांगे यांनी न्या. संदीप शिंदे समितीने आजपर्यंत केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली तसेच जिल्हाधिकारी व सर्व तहसीलदार यांना कुणबी नोंदी असलेल्यांना प्रमाणपत्र देण्याबाबत निर्देश देण्यात आल्याचे सांगितले. बैठकीत विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते रावसाहेब दानवे, विधान सभेतील विरोधी पक्ष नेते वड्डेटीवार तसेच इतर उपस्थित पक्षांच्या प्रतिनिधींनी आपापल्या सूचना मांडल्या.