किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.6° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.6° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– २० डिसेंबरपर्यंत चालणार,
नागपूर, (०६ डिसेंबर) – नागपूर करारानुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही उपराजधानीत हिवाळी अधिवेशन उद्या, गुरुवार, ७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, हिवाळी अधिवेशनादरम्यान पाऊस सुरू झाल्याने या अधिवेशनाला हिवाळ्याऐवजी पावसाळी अधिवेशनाचा लूक आला आहे. महायुती सरकारच्या कार्यकाळातील हे शेवटचे हिवाळी अधिवेशन ठरणार असून, अवकाळी पाऊस, गारपीट, मराठा आरक्षण, ड्रग्ज प्रकरण, शासकीय रुग्णालयातील बाल मृत्युप्रकरण हे विषय या अधिवेशनात गाजणार आहेत.
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचे कामकाज येत्या ७ डिसेंबर ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. पहिल्या आठवड्यात दोन दिवस, दुसर्या आठवड्यात पाच दिवस, तर तिसर्या आठवड्यात तीन दिवस सभागृहाचे कामकाज चालेल. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्यात सत्ता समीकरण बदलल्यानंतर पहिल्यांदाच उपराजधानीत सरकार येणार आहे. मराठा आरक्षण आणि शेतकर्यांचा मुद्दा राज्यभर तापलेला आहे. आरक्षण, शेतकर्यांना मदत आणि पुरवणी मागण्या यावर अधिवेशनाचा बहुतांश वेळ जाणार आहे. येत्या काळातील निवडणुकीचे सर्वांना वेध लागले आहेत. विद्यमान सरकारचे नागपुरातील हे अखेरचे अधिवेशन असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या वर्षी विरोधी पक्षात होते. सदस्य अपात्रतेबाबत सुरू असलेली सुनावणी आणि बदललेल्या समीकरणामुळे महाविकास आघाडीचा ताळमेळदेखील लक्ष वेधणारा राहणार आहे.
अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या सादर केल्यानंतर शोक प्रस्ताव मांडण्यात येईल. दुसर्या दिवशी शासकीय कामकाजात मराठा आरक्षणाचा मुद्दा येण्याची शक्यता आहे. लगेच दोन दिवस सुट्या आल्या. सोमवार व मंगळवारी शासकीय कामकाज आणि पुरवणी मागण्यांवर चर्चा आहे. नंतरचे तिन्ही दिवस शासकीय कामकाज आहे. परत दोन दिवस सुट्या राहतील. शेतकर्यांवरील अस्मानी संकट, मराठा आरक्षण व अन्य ज्वलंत प्रश्न राज्यात आवासून उभे आहेत. २०२४ हे निवडणुकीचे वर्ष आहे. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. परंतु यंदा हिवाळी अधिवेशनाचे कामकाज केवळ दहा दिवसांचे निश्चित झाले आहे.
नागपूर कराराकडे दुर्लक्ष
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन किमान ४ ते ६ आठवडे उपराजधानीत घेण्यात यावे, असे नागपूर करारानुसार ठरले आहे. मात्र, आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी एकदाही सहा आठवडे सरकार येथे आणलेले नाही. एखाद-दोन अपवाद वगळता २ ते ३ आठवडे विधिमंडळाचे कामकाज चालले. पहिल्या युतीच्या काळात कराराचे पालन करण्याची ग्वाही तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी दिली होती. मात्र, त्यांच्या काळातही चार-पाच आठवडे अधिवेशन झाले नाही.