किमान तापमान : 24.05° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 6.18 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– सरकारच्या धोरणावर वडेट्टीवार यांचे प्रतिपादन,
नागपूर, (०६ डिसेंबर) – अवकाळीमुळे संकटात सापडलेल्या शेतकर्यांना सरसकट मदत मिळावी, राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था सुधारावी, आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. परंतु, या कोणत्याही विषयावर चर्चा होत नाही. महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आवासून उभे असताना सत्ताधारी पक्षांनी ठेवलेल्या चहापानाला जाणे उचित ठरणार नाही, तो शेतकर्यांशी द्रोह ठरेल. त्यामुळे विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रपरिषदेत सांगितले.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविभवनात आयोजित पत्रपरिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली. अवकाळीमुळे राज्यातील शेतकर्यांवर अस्मानी संकट ओढवले असताना शेतकर्यांना मदत करण्याऐवजी हे सरकार शासन आपल्या दारी उपक्रमावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करीत आहे. नुकसानीचे सरसकट पंचनामे न करता दुष्काळसदृश परिस्थिती दाखविली जात आहे. परिणामत: शेतकर्यांना कुठलीच मदत मिळणार नाही. या सरकारला शेतकर्यांविषयी मुळीच कणव नाही. हे सरकार संवेदनशून्य असून, दिल्लीतील सत्ताधार्यांच्या इशारावर नाचणारे कठपुतळी सरकार असल्याची टीका त्यांनी केली.
राज्यावर वाढलेले कर्ज, शेतकर्यांची दैन्यावस्था, शेती क्षेत्राची दुरवस्था, शासकीय रुग्णालयांत मृत्युतांडव, राज्यातील पाणीटंचाई, स्मारकांची स्थिती, आरक्षणाबाबतची असंवेदनशीलता, अल्पसंख्यकांबाबत नकारात्मक दृष्टिकोन, कंत्राटी भरती व बेरोजगारीमुळे युवकांमधील वाढता रोष, कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक, अंतर्गत सत्ता स्पर्धेचे दुष्परिणाम, विदर्भातील कापूस, धान उत्पादक शेतकर्यांवरील संकट अशा अनेक समस्या असताना सरकार चहापान कार्यक्रम आयोजित करीत आहे. यावरून सरकारचा संवेदनशीलपणा हरवल्याचे दिसून येते.
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्राची ओळख दंगलग्रस्त महाराष्ट्र अशी या महायुती सरकारने केली. पुरोगामी महाराष्ट्रात सर्वांत जास्त दंगली झाल्या. महाराष्ट्रात २०२२ मध्ये दंगलीच्या तब्बल ८ हजार २१८ प्रकरणांची नोंद झाली आहे. ही त्या वर्षातील देशातील सर्वाधिक नोंद असल्याची केंद्रीय गृहमंत्रालयाची माहिती आहे, याकडे वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले. पत्रपरिषदेला विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री पृथवीराज चव्हाण, अशोक चव्हाण, राकाँचे जयंत पाटील, शेकापचे जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, सुनील प्रभू, उपस्थित होते.