किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.3° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.3° से.
23.71°से. - 25.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनाशिक, (१२ जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महाराष्ट्रात दाखल झाले. येथे त्यांनी सर्वप्रथम नाशिकमध्ये रोड शो केला. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. रोड शोनंतर पंतप्रधान मोदींनी गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या रामकुंडावर प्रार्थना केली. यानंतर त्यांनी श्री काळाराम मंदिर येथेही पूजा केली. पंतप्रधान मोदींनी येथे वाद्य (मंजिरा) देखील वाजवले. यानंतर पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. काळाराम मंदिरात पंतप्रधान मोदी यांना चांदीचा कुंभ आणि पगडी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भारत विकसित राष्ट्र बनण्यासाठी संकल्प करण्यात आला. रामकुंड परिसराला भेट देऊन मोदी हे काळाराम मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले.
काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरात मुख्य दरवाजाने दाखल झाले. येवल्याच्या पैठणीचा शेला देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी सर्वप्रथम हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाची विधिवत पूजा आणि महाआरती करण्यात आली. त्यानंतर प्रधान संकल्प करण्यात आला. यावेळी रामरक्षा पठण देखील करण्यात आली. मंदिराचे मुख्य पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांनी पंतप्रधान मोदींना पूजा सांगितली. तसेच पंतप्रधान मोदींनी काळाराम मंदिरासमोरील स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याला अभिवादन केले.