किमान तापमान : 24.05° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 6.18 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– सुनावणीच्या तिसर्या दिवशी व्हीप बजावण्याचा मुद्दा गाजला,
मुंबई, (२४ नोव्हेंबर) – व्हीप कोणी बजावला, त्यावर स्वाक्षरी कोणी केली, व्हीप स्वतःच्या अधिकारात बजावला की दुसर्याच्या सांगण्यावरून बजावला, ठाकरेंनी लेखी सूचना दिल्या होत्या की तोंडी, व्हीप प्रत्यक्ष दिला तर किती लोकांना दिला, जे प्रत्यक्ष उपलब्ध नव्हते त्यांना व्हीप कसा बजावला, प्रत्यक्ष किती आमदार उपलब्ध होते आणि किती आमदार उपलब्ध नव्हते, अशा अनेक प्रश्नांचा भडिमार करत शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभूंना घाम फोडला. सुनावणीच्या तिसर्या दिवशी व्हीप बजावण्याच्या मुद्यावरून अॅड. जेठमलानींनी प्रभूंना चक्रव्यूहात अडकवल्याचे चित्र दिसले.
पहिल्या दोन दिवसांत ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांना गोंधळून टाकल्यानंतर तिसर्या दिवशीही अॅड. जेठमलानी यांनी प्रभूंचा चांगलाच क्लास लावला होता. प्रभू यांना अॅड. जेठमलानी यांच्या कोणत्याही प्रश्नाची ठामपणे, स्पष्ट अशी उत्तरे देता आली नाहीत. तीन दिवसांच्या सुनावणीत सुनील प्रभू हे मला आठवत नाही, ते रेकॉर्डवर आहे, जे रेकॉर्डवर आहे तेच असेल, मी काही गुन्हेगार नाही, वारंवार तेच ते विचारत आहेत, अध्यक्ष पक्षपात करत आहेत, अशीच उडवाउडवीची उत्तरे देताना दिसले. शिवाय ठाकरे गटाचे वकील अधूनमधून आक्षेप घेत प्रभूंचा बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. पण त्यात त्यांना फारसे असे यश मिळाले नाही.
प्रतोद म्हणून सुनील प्रभूंनी बजावलेल्या व्हीपच्या तारखांमध्ये गोंधळ आहे. २१ जूनला झालेल्या बैठकीवरूनही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मुळात बैठक झाली की नाही, यावरच संशय निर्माण केला जात आहे. शिवाय पोच म्हणून घेतलेल्या छायाप्रतीवर तारीख टाकलेली नाही. कार्यालयीन कर्मचार्यांमार्फत व्हीप पाठविला जातो. त्याने बजावला आहे की नाही याबाबत खातरजमा सुनील प्रभूंनी केली नाही. दिला असेल असे प्रभू उत्तरात म्हणाले. सुनील प्रभूंनी विधानभवनात दाखल केलेला दावा आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात मोठी तफावत आहे, विरोधाभास आहे, असे अॅड. जेठमलानींनी सुनावणीप्रसंगी कागदोपत्री दाखवून दिले. त्यामुळे आता खर्या अर्थाने १६ आमदारांना अपात्र करण्यासाठी केली गेलेली प्रक्रिया म्हणजे बोलावलेली बैठक आणि बजावण्यात आलेला व्हीप हेच अवैध असल्याचे सिद्ध करण्यात अॅड. जेठमलानी यांनी कंबर कसलेली दिसते.
तुम्ही ज्युनिअर आहात मध्येमध्ये बोलू नका
अॅड. जेठमलानींच्या उलटतपासणीमुळे सुनील प्रभू पुरते गोंधळलेले असून, त्यांना कोणत्याही प्रश्नांची उत्तरे नीट देता येत नसल्याने, त्यांचा बचाव करण्यासाठी वारंवार ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांना मध्येमध्ये हस्तक्षेप करावा लागत आहे. वारंवारच्या हस्तक्षेपामुळे शिंदे गटाचे वकील अॅड. जेठमलानी प्रचंड वैतागले आणि अॅड. कामतांना तुम्ही ज्युनिअर आहात. मध्येमध्ये बोलू नका, अशा शब्दात झापले.
१९ दिवस चालणार सुनावणी
आमदार अपात्रता प्रकरण सुनावणी १९ दिवस चालणार असून, आता पुढील सुनावणी २८, २९ आणि ३० नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतर १, २, ५, ६ आणि ७ डिसेंबरला सुनावणी पार पडणार असून, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान म्हणजे ११ ते १५ डिसेंबरला नागपूर येथे सलग सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतर १८ ते २२ डिसेंबरदरम्यान सलग सुनावणी पार पडणार आहे.