किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशपुणे, (२४ नोव्हेंबर) – राहुल गांधींना देशातील जनता आणि काँग्रेस पक्ष सुद्धा गांभीर्याने घेत नाही, मग त्यांना मी का गांभीर्याने घेऊ, असा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.
पुणे येथे आगमन झाले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे या देशातील भ्रष्टाचारी, दुराचारी, नेते भयभीत आहेत. या देशातील सामान्य जनतेला विचाराल तर ते नरेंद्र मोदींना देशाचे रक्षक, देशाचे यशस्वी नेतृत्व करणारे आणि गरिबांसाठी पोटतिडकीने काम करणारे नेते मानतात. राहुल गांधींना कुणीच गांभीर्याने घेत नाही. दरम्यान, पुणे येथे बागेश्वरधाम पं. धीरेंद्र शास्त्री यांच्या रामकथेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले की, भारत जागृत झाला, तर संपूर्ण विश्व जागृत होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात २२ जानेवारी २०२४ रोजी एक इतिहास रचला जाईल. अयोध्येत राममंदिराचे लोकार्पण होईल. जेव्हा लोक सनातनवर टीका करतात, तेव्हा सनातनचा अर्थच त्यांना ठावुक नसतो. रूढीवाद, जातीयवाद म्हणजे सनातन नाही, तर सनातन म्हणजे अनादि आणि अनंत. सनातन हा भारताचा आहे, जो सर्वांना जोडणारा आहे आणि ज्यात उच-नीच नाही. प्रभूश्रीरामाची कथा ऐकायला मिळणे, हा आयुष्य सफल करणारा क्षण आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.