किमान तापमान : 24.75° से.
कमाल तापमान : 26.24° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.52 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.24° से.
23.74°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी कुछ बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलऔरंगाबाद, [१० ऑगस्ट] – न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्यातील १८ हजार अंशकालीन शिक्षकांना सेवेत कायम करुन घेण्याऐवजी टोलवा टोलवी करणारे राज्यसरकार या आदेशाचे पालन करीत नाहीत, युतीची सत्ता येताच तुम्हाला कायम करु अशी ग्वाही विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सात दिवसांपासून उपोषणास बसलेल्या राज्य अंशकालीन शिक्षकांना रविवारी दिली.
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात असलेल्या कार्यक्रमानिमित्त विनोद तावडे हे शहरात आले होते. या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या अंशकालिन शिक्षकांची भेट घेतली. यावेळी उपोषणकत्र्यांनी शासन कशा पध्दतीने टोलवा टोलवी करीत आहे, याची माहिती तावडे यांना दिली. या वर बोलताना विनोद तावडे म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकार यावर विचार करीत नाही, हे योग्य नसून तातडीने आदेशाचे पालन करीत सर्व अंशकालिन निदेशकांना सेवेत कायम करणे आवश्यक होते. मात्र या सरकारला कारकून पध्दतीने काम करण्याची सवय पडली असल्याने अपेक्षा करणे या सरकारकडून अवघड झाले आहे. राज्यात लवकरच विधानसभा निवडणूका होणार असून त्यामध्ये या सरकारला धडा शिकवून युतीची सत्ता येणार येताच तात्काळ सर्व निदेशकांना सेवेत कायम करुन घेण्याची ग्वाही यावेळी तावडे यांनी दिली.
तावडे यांच्या समवेत भाजपा सरचिटणीस अतुल सावे, शहराध्यक्ष भगवान घडामोडे, बसवराज मंगरुळे, प्रदेश समितीचे सदस्य व मनपा नगरसेवक अनिल मकरिये आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान गेल्या सात दिवसांपासून बसलेल्या या उपोषण कत्र्यांना भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, आ. प्रशांत बंब, माजी खासदार उत्तमसिंह पवार आदींसह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भेट दिली असल्याची माहिती बालाजी आडे, पद्माकर कोळी, धनंजय पांडव, सागर मुने, संध्या बहुरुपी आदींनी दिली.