किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.34°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, ५ नोव्हेंबर – सुशांतसिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज खटलाप्रकरणी यापूर्वी अटक करण्यात आलेले धर्माटिक एंटरटेन्मेंटचे माजी कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसाद यांना आणखी एका ड्रग्ज खटल्यात अटक करण्यात आली आहे. नायजेरियन नागरिकाकडून कोकेन घेतल्याचे हे प्रकरण आहे. विशेष एनडीपीएस कोर्टाने बुधवारी एनसीबीला प्रसाद यांची कोठडी दिली. नायजेरियन नागरिक उका एमेका याच्याकडून अंधेरी उपनगर परिसरात चार ग्रॅम कोकेन जप्त केले होते. प्रसाद यांच्यासह डिमीट्रीयस या आफ्रिकन नागरिकास देखील या केसप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सदर व्यक्ती एका बॉलिवूड कलाकाराची जवळची नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे. पुणे जिल्ह्याजवळील लोणावळा येथून ही अटक करण्यात आली असून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे पुढील तपास करत आहेत.
आणखी एकाला एनसीबीद्वारे अटक
टीव्ही आणि फिल्मी जगताला ड्रग्ज पुरवणार्या एका ३० वर्षीय व्यक्तीस एनसीबीने अटक करण्यात आली असून सदर प्रकरणाचे धागे थेट सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्युप्रकरणी व तत्कालीन ड्रग्ज खटल्यापर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे संबंधित अधिकार्यांनी सांगितले आहे. पकडण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव अब्दुल वाहिद असून अंधेरी येथील आझाद नगर भागातून याला अटक करण्यात आली. सदर व्यक्तीकडून ६५० ग्राम गांजा, मेफिड्रोन नावाचे ड्रग, चरस, एक चारचाकी वाहन व १ लाख ७५ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अब्दुल वाहिदच्या रूपात मोठा मासा गळाला लागला असल्याचे मत एनसीबीच्या संबंधित अधिकार्यांनी व्यक्त केले. यापूर्वीही सुशांत सिंग राजपूत मृत्युप्रकरणात बाहेर आलेल्या ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह अनेक संशयितांना अटक करण्यात आली होती.
रिया चक्रवर्ती सध्या जामिनावर बाहेर असून एनसीबीने अलिकडेच या ड्रग्ज प्रकरणात अनेक बॉलिवूड कलाकारांवर प्रश्नचिन्ह उचलले होते. सुशांतसिंग राजपूत यांनी वांद्रा येथील आपल्या राहत्या घरी जून महिन्यात आत्महत्या केली होती.