किमान तापमान : 29.17° से.
कमाल तापमान : 31.05° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 59 %
वायू वेग : 4.78 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.05° से.
27.34°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशअमली पदार्थ सेवन प्रकरण,
मुंबई, ४ ऑक्टोबर – अमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी रेव्ह पार्टीतून अटक करण्यात आलेला अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खान याच्यासह अन्य तिघांना किल्ला न्यायालयाने गुरुवारपर्यंत एनसीबीच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
न्यायालयाने आर्यन खानबरोबरच मुनमून व अरबाज या दोघांनादेखील गुरुवारपर्यंत एनसीबी कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. आर्यन खानकडून वकील सतीश मानशिंदे यांनी बाजू मांडली. अतिरिक्त महाधिवक्ता अनिलसिंह यांनी एनसीबीची बाजू मांडली. आर्यनच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व धक्कादायक छायाचित्र स्वरूपातील माहिती आढळल्याचे समोर आल्याने, त्याच्या कोठडीत ११ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली जावी. अशी मागणी एनसीबीकडून करण्यात आली.
आंतरराष्ट्रीय तस्करांचा सहभाग?
आर्यनच्या फोनमधील चॅट आंतरराष्ट्रीय स्तरावरील अमली पदार्थ तस्करीकडे इशारा करते, असा दावा एनसीबीने न्यायालयात केला.
आणखी नऊ जणांना अटक
एनसीबीच्या अधिकार्यांनी आज पुन्हा क्रूझवर जाऊन तपासणी सुरू केली असून, आता आणखी नऊ जणांना अटक केली. एनसीबीने सोमवारी सकाळी मुंबईला परतलेल्या क्रूझवरून अमली पदार्थ जप्त केले. त्यानंतर नऊ जणांना अटक केली. या आरोपींनाही गुरुवारपर्यंत एनसीबीच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालायने दिला.