किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 5.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
27.43°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.11°से. - 29.65°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशतिघांसह कोठडीत रवानगी, एनसीबीची कारवाई, क्रूझवरील रेव्ह पार्टीत होती धनिकबाळे,
मुंबई, ३ ऑक्टोबर – मुंबईतील अमलीपदार्थांची प्रकरणे काही कमी होण्याचे नाव घेत नाही. मादकपदार्थ नियंत्रण विभाग अर्थात् एनसीबीने शनिवारी रात्री उशिरा एका क्रूझवर सुरू असलेल्या रेेव्ह पार्टीवर छापा मारून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह सहा जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर १० तास झालेल्या चौकशीनंतर आर्यनसह तीन जणांना अटक करण्यात आली. उर्वरित तीन जणही सध्या एनसीबीच्या ताब्यात आहेत. दरम्यान, रविवारीही सुरू राहणार्या न्यायालयात आर्यनसह तिघांना हजर केले असता, त्यांना एक दिवस एनसीबीच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
आर्यनच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यांच्या युक्तिवादामुळे एनसीबीची दोन दिवसांच्या कोठडीची मागणी स्वीकारण्यात आली नाही. न्यायालयात हजर करण्यापूर्वी आर्यनसह तिघांचीही जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. एनसीबीच्या या कारवाईत ३० ग्रॅम चरस, २० ग्रॅम कोकेन, २० ग्रॅम टॅबलेट्स, १० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले आहे. या घटनेने पुन्हा एकदा चित्रपटसृष्टी हादरली असून, या प्रकरणाच्या निमित्ताने आणखी किती सेलिब्रिटींच्या नावाचा खुलासा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणी दहा जणांना ताब्यात घेऊन त्यांची दहा तास चौकशी करण्यात आली. यात दोन युवतींचाही समावेश आहे. एक क्रूझ गोव्याकडे आणि नंतर लक्षद्वीपकडे जाणार होते. या क्रूझवर रेव्ह पार्टी होणार असल्याची गोपनीय माहिती एनसीबीला मिळाली होती. एनसीबीचे अधिकारी या क्रूझवर प्रवासी म्हणून दाखल झाले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या पार्टीसाठी ८० हजार ते पाच लाख पर्यंतचे प्रवेश शुल्क ठेवण्यात आले होते, अशी माहिती प्राप्त झाली.
फोन केला जप्त
कार्यक्रमाच्या आयोजकांनी आपल्या नावाचा वापर करीत इतरांना आमंत्रण दिल्याचा दावा आर्यनने केला आहे. या पार्टीतील सहभागींनी प्रत्येकी ८० हजारांपेक्षा जास्त रुपयांचे शुल्क भरले होते. एनसीबीने आर्यनचा फोन जप्त केला असून, त्यातील ‘चॅट हिस्ट्री’ तपासण्यात येत आहे.
कॉलरमध्ये अमलीपदार्थ
या प्रकरणात सहभागी असलेल्यांनी पँट, अंडरवेअर, कॉलरच्या शिलाईमध्ये तसेच महिलांनी आपल्या पर्सच्या हँडलमध्ये अमलीपदार्थ लपवून आणले होते. आर्यनसोबत अरबाज मर्चंट, मुनमून धमेचा, नुपूर सारिका, इसमीतसिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा या सर्वांचीही एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. त्यापैकी आर्यनसह अरबाज आणि मुनमून यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.
आठ तास कारवाई
काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेला सुशांतसिंह राजपूतचा मित्र कुणाल जानीने दिलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. एनसीबी क्रूझवरील कारवाई आठ तासांपेक्षा जास्त वेळ सुरू होती. जहाज मुंबईवरून निघताच रेव्ह पार्टी सुरू झाली. अमलीपदार्थ सापडल्यानंतर क्रूझ मुंबईकडे वळवण्यात आले. एनसीबी अधिकार्यांनी आर्यनचे क्रूझवरील व्हिडीओ मिळवले.
मुंबईतच कोट्यवधीचा व्यवसाय
एकट्या मुंबईतच अमलीपदार्थाचा व्यवसाय कोट्यवधी रुपयांचा आहे. एनसीबीच्या आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये नवी मुंबईत सुमारे ३ कोटीचे ड्रग्स जप्त करण्यात आले. या दरम्यान २४९ लोकांना अटक करण्यात आली आणि १५३ गुन्हे दाखल करण्यात आले. २०२० मध्ये कोरोनाच्या पृष्ठभूमीवर टाळेबंदी लावल्यामुळे या व्यवसायात मोठी घट झाली. गेल्या वर्षी ३०० पेक्षा जास्त छापे पडले होते. सरकारी आकडेवारीनुसार, २०२० साली ६० टक्क्यांपर्यंत घट झाली होती. गेल्या वर्षी ८६ लोकांनाच अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून सुमारे ९३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते. यावर्षी जानेवारी ते जुलैदरम्यान ६.३८ कोटी रुपयांची ड्रग्स परदेशी लोकांकडून जप्त करण्यात आली आहेत. यात एमडी (मेफड्रन किंवा म्याव म्याव किंवा एमकेट) आणि कोकेनचा समावेश होता.
शाहरुखनेच बिघडवले मुलाला!
आर्यनला अटक होताच शाहरुख खानचा एक जुना व्हिडीओ समाज माध्यमांवर फिरत आहे. ज्यात शाहरुख सांगतोय की, आर्यनने किशोरवयात सर्व काही करावे. त्याने ड्रग्स घ्यावे, मुलींच्या मागे फिरावे, सेक्स करावा. शाहरुखने सिमी ग्रेवाल हिच्या शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत हे वाक्य म्हटले होते. आता त्याचा मुलगा ड्रग्स घेताना पकडला गेल्याने समाजमाध्यमांवर हा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.