किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलन्यायालयाने का म्हटलं : हा मानसिक अत्याचार नाही,
मुंबई, (१७ सप्टेंबर) – पती आपलं शारीरिक आणि मानसिक शोषण करतो, असा आरोप पत्नीने उच्च न्यायालयात केला आणि घटस्फोटाची मागणी केली. या प्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने पत्नीने पतीवर केलेले मानसिक आणि शारीरिक शोषणाचे आरोप फेटाळून लावले. मुंबई उच्च न्यायालयाने तुला अक्कल नाही, तू वेडी आहेस ही मराठी भाषेत सर्रास वापरली जाणारी वाक्ये असून ती पतीने पत्नीला उद्देशून म्हणणे म्हणजे मानसिक अत्याचार नाही, असं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणी कुटुंब न्यायालयाने दाम्पत्याला घटस्फोट नाकारला होता, हे विशेष ! त्या निर्णयाला पतीने आव्हान दिले आणि उच्च न्यायालयात अपील केले होते.
न्यायालयात घटस्फोटाची मागणी करणार्या या जोडप्याचा विवाह २००७ मध्ये लग्न झाला होता. पण, लग्नाच्या काही काळानंतर दोघांमध्ये मतभेद झाले आणि त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. उल्लेखनीय हे की, पतीने वर्ष २०१२ मध्ये महापालिका निवडणूक लढवली होती. त्यानंतर २०१३ मध्ये त्याच्याविरोधात पत्नीने गुन्हा दाखल केला होता. आपल्यावर केलेल्या एफआयआरमधील बिनबुडाच्या आरोपांमुळे आपली आणि आपल्या कुटुंबाची प्रतिमा मलिन झाल्याचे पतीने न्यायालयाला सांगितले. याउलट पत्नीने आरोप केला की, पती आणि त्याच्या कुटुंबियांनी नेहमीच आपला अपमान केला. तिच्या आरोपांनुसार ते वैवाहिक जीवन भयावह होते. पतीने तिला २००९ मध्येच तिच्या पालकांच्या घरी सोडलं आणि तेव्हापासून ते वेगळे राहत आहेत. पती रात्री उशिरा घरी येतो आणि अपमानित करण्याच्या उद्देशाने आपल्यावर ओरडायचा, असं पत्नीने न्यायालयात सांगितलं.
दुसरीकडे पतीने आरोप केला आहे की, आपलं संयुक्त कुटुंब असून आपण एकत्र कुटुंबातच राहणार असल्याचे आपण लग्नापूर्वीच तिला सांगितले होते. पण, लग्नानंतर तिने याबाबत तक्रार केली आणि आपण वेगळं राहायचा हट्ट ती करू लागली. ती आपल्या आई-वडिलांचा आदर करत नाही आणि त्यांची काळजी घेत नाही. शिवाय तिने घरदेखील सोडले आहे, असे आरोप पतीने केले आहेत. तपासणीत, पत्नीने पतीवर खोटे आरोप केल्याचं उघड झालं असून हे आरोप खटल्यादरम्यान तिच्या साक्षीशी जुळले नाहीत.
व्यवहारातील बोली भाषेत किंवा जेव्हा घरात मराठी बोलतात तेव्हा एकमेकांना उद्देशून असे शब्द सर्रास वापरले जातात. तुला अक्कल नाही किंवा तू वेडी आहेस, असे म्हणणे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मानसिक शोषण समजलं जाऊ शकत नाही. शिवाय ही वाक्ये शिवीच्या श्रेणीतही येऊ शकत नाहीत, असे नमूद करून न्यायालयाने आपली भूमिका मांडली. न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने याप्रकरणी सुनावणी केली. दरम्यान कोर्टाने पतीला घटस्फोट मंजूर केला आहे.