किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– मंडळाने दोन महिन्यांसाठी मोजले लाखो रुपये,
मुंबई, (११ सप्टेंबर) – लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाकडून यंदा मोठा निर्णय घेतला आहे. मंडळाने तब्बल २६.५ कोटी रुपयांचे विमा संरक्षण ५ लाख ४० हजारांचा विमा हप्ता भरून घेतले आहे. हा विमा न्यू इंडिया इन्श्यूरन्स कंपनीकडून उतरवण्यात आला. यंदाच्या गणेशोत्सवासाठी काहीच दिवस राहिले आहेत. गणपतीच्या भक्तांना गणेश चतुर्थीचे वेध लागले आहेत. यंदा गणेश चतुर्थी १९ सप्टेंबरला असून, त्या दिवसापासून पुढील काही दिवस भक्तांसाठी आनंदाची पर्वणी असेल. मुंबईत दरवर्षीप्रमाणं यंदाही मूर्तीशाळेतून मोठमोठ्या मंडळांच्या मूर्ती एक आठवडाभर अगोदरच मंडपात दाखल झाल्या आहेत.
२४ ऑगस्ट ते २३ ऑक्टोबर या दोन महिन्यांसाठी हे विमाकवच घेण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास त्यासाठी १२ कोटींचे हे विमा कवच आहे. विजेच्या उपकरणांसाठी किंवा इतर गोष्टींमुळे हानी झाल्यास त्यासाठी अडीच कोटींचे विमा संरक्षण असेल. लालबागच्या राजाच्या गणेश मूर्तीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंसाठी ७ कोटी ४ हजार रुपयांचे विमा संरक्षण घेण्यात आले. याशिवाय प्रसादातून विषबाधा अशा प्रकारच्या घटनांसाठी ५ कोटींचे विमा संरक्षण घेण्यात आले.
१२ कोटींच्या विमा संरक्षणात गणपतीचे भक्त, मंडळाचे विश्वस्त, नोंदणीकृत कार्यकारी सदस्य, स्वंयसेवक, स्थानिक रहिवासी, संरक्षण कर्मचारी, वॉचमन यांचा वैयक्तिक अपघात विमा काढण्यात आला आहे. एखादी अप्रिय घटना घडल्यास ५ लाखांची भरपाई मिळणार आहे. लालबागचा राजा मंडळाकडून ज्यांना ओळखपत्र दिली जातील, ते यासाठी पात्र असतील, असे मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी यांनी सांगितले.