किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 31.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 5.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.99° से.
27.43°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.11°से. - 29.65°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे प्रतिपादन, चिखली अर्बनच्या उपक्रमांचे कौतुक,
चिखली, ३१ ऑक्टोबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर धोरणांमुळे भारताची मान जगात उंचावली असून, भारताची वाटचाल महासत्तेकडे होत आहे. आपल्या लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग खात्याच्या माध्यमातून रोजगार वाढविणार्या योजना वाढविण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. चिखली अर्बन बँकेचे उत्कृष्ट काम सुरू असून, लोकांना रोजगार देण्याचे त्यांचे प्रयत्न असतात. त्या माध्यमातून चिखली अर्बन बँक विधायक कार्य करीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री मंत्री नारायण राणे यांनी चिखली येथे केले.
भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष तथा चिखली अर्बन को-ऑप. बँकेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त चिखली अर्बन बँक, चिखली अर्बन बहुउद्देशीय संस्था व भगवानदास गुप्ता फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्योजकता प्रोत्साहन व प्रशिक्षण शिबिर आज रविवारी रानवारा मंगल कार्यालय येथे पार पडले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार डॉ. संजय कुटे, तर प्रमुख उपस्थितीमध्ये आमदार आकाश फुंडकर व चिखलीच्या आमदार श्वेता महाले उपस्थित होत्या.
यावेळी व्यासपीठावर ऍड. विजय कोठारी, प्रेमराज भाला, रामकृष्ण शेटे, पंडितराव देशमुख, संध्या कोठारी, पं. स. सभापती सिंधू तायडे, उपनगराध्यक्षा वजीराबी शे. अनिस, सुरेशआप्पा खबुतरे, डॉ. प्रतापसिंग राजपूत, संजय चेके पाटील, सत्यनारायण लढ्ढा यांच्यासह चिखली अर्बनचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दिवटे, संचालक रेखा खेडेकर, विजयराज शिंदे, तोताराम कायंदे यांची उपस्थित होती. प्रास्ताविक डॉ. आशुतोष गुप्त यांनी केले. यावेळी माजी मंत्री संजय कुटे, आ. आकाश फुंडकर, आ. श्वेता महाले यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन कवी अझीम नवाझ राही यांनी केले.
रेखा खेडेकरांना दिला विचार करण्याचा सल्ला
व्यासपीठावर उपस्थित चिखली मतदार संघाच्या माजी आमदार रेखा खेडेकर यांच्यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, त्या योग्य ठिकाणी दिसल्या नसल्यामुळे खंत वाटली. आमच्या गोटात कशा शोभून दिसतात बघा, ताई लवकर योग्य विचार करा आणि विलंब लावू नका, असा सल्लादेखील राणे यांनी त्यांना दिला.