किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 31° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 5.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31° से.
27.43°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.11°से. - 29.65°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशभ्रष्टाचाराविरुद्ध मुंबई महापालिकेची धडक मोहीम,
मुंबई, (३१ जानेवारी) – मुंबई भाजपाने पोलखोल सभा घेऊन महापालिकेतील भ्रष्टाराविरोधात जोरदार मोहीम उघडली होती. त्याचीच परिणीती की काय, शिंदे-फडणवीस सरकार येताच भ्रष्टाचारात लीन असलेल्या पालिका प्रशासनाने भ्रष्ट कर्मचार्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
महापालिकेने भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये गुन्हा सिद्ध झालेले ५५ कर्मचारी सेवेतून काढून टाकले तर, गुन्ह्याची नोंद झालेले ५३ व अन्य फौजदारी प्रकरणी गुन्हा नोंद झालेले ८१ याप्रमाणे एकूण १३४ कर्मचारी निलंबित केले. बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने भ्रष्टाचाराविरोधात अत्यंत कठोर कारवाई करीत असते. १९८८ मधील भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला आवश्यक ते सहकार्य महापालिका प्रशासनाकडून करण्यात येते. भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार, न्यायालयीन स्तरावर आरोपपत्र दाखल करण्याचे अधिकार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे आहेत, महापालिकेकडे नाहीत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एखाद्या कर्मचार्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने दोषी ठरवल्यास त्या कर्मचार्याला सेवेतून बडतर्फ करण्यासारखी कारवाई महापालिका प्रशासनाकडून करण्यात येते. त्यानुसार, गुन्हा सिद्ध झालेले ५५ कर्मचारी बडतर्फ करण्यात आले. या कर्मचार्यांना नोकरी तर गमवावी लागलीच, निवृत्ती वेतन, ग‘ॅच्युईटी अशा लाभांनाही मुकावे लागले आहे.