किमान तापमान : 27.87° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.82°से. - 30.57°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.82°से. - 30.41°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.75°से. - 30.46°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 31.02°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 30.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.49°से. - 30.08°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला उद्धव ठाकरे यांचा खरपूस समाचार,
मुंबई, (१५ जानेवारी) – उठसूठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी खरपूस समाचार घेतला. कुठे पंतप्रधान मोदी आणि कुठे तुम्ही? मोदींच्या नखाची तरी सर आहे का तुमची, असा घणाघात शिंदे यांनी ठाकरेंवर चढविला.
पंतप्रधान मोदी देशाला नव्या उंचीवर नेत आहेत. तुम्ही घरात बसून महाराष्ट्राला १० वर्षे मागे नेले म्हणून आम्ही तुम्हाला हटविले. तुमच्या काळात मागे गेलेले राज्य आता वेगाने पुढे जात आहे. बंद पडलेले प्रकल्प पुढे नेत आहोत. मेट्रो शिवडीसह अनेक प्रकल्प तुम्ही बंद केले. आपल्या अहंकारापोटी प्रजेला मागे नेणे, जनतेचे नुकसान करण्याचे दुर्दैवी काम तुम्ही केले आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीच्या राजकारणावरून केलेल्या वक्तव्यालाही मुख्यमंत्री शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले. तेव्हा पक्षाची गरज होती. तरुण, उच्चशिक्षित चेहरा हवा होता. श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीमुळे पक्षाला एक जागा मिळाली. ती जागा आपण जिंकली. राज्यात विकासाची जी काम सुरू केली आणि ज्या पद्धतीने कामे सुरू आहेत, त्याला केंद्राचा पाठिंबा मिळत आहे, असे शिंदे म्हणाले. ठाकरे यांनी टीका करावी. त्यांच्या टीकांना आम्ही मुळीच महत्त्व देत नाही. कारण, कोणताही निर्णय जेव्हा त्यांच्या विरोधात जातो, तेव्हा ते टीका करतात आणि निर्णय अनुकूल आला की, लोकशाहीचा विजय झाला, असे म्हणतात, असा चिमटाही शिंदे यांनी काढला.