किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार,
मुंबई, (१७ नोव्हेंबर) – पुढील महिन्यात नागपुरात होणार्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रयत्न करणार आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनिमित्त आपल्या निवासस्थानी पत्रकारांसोबत गुरुवारी चर्चा करताना सांगितले. पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट करताना फडणवीस यांनी याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
पुढच्या वर्षी मी नागपूरमधून विधानसभा निवडणूक लढवणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. सध्या ते नागपुरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. पुढच्या दहा वर्षांत स्वतःला कुठे पाहाल, या प्रश्नाला उत्तर देताना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मी भाजपासोबतच राहणार आहे तसेच पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी पार पाडणार आहे.
जानेवारीत अयोध्येतील राममंदिराच्या नियोजित लोकार्पणाबद्दल ते म्हणाले की, लोक याबद्दल उत्सुक आहेत आणि अनेकांना या सोहळ्यात उपस्थित राहायचे आहे. उत्तरप्रदेश सरकारने अयोध्येत महाराष्ट्र भवनासाठी जमीन देण्याचे मान्य केले आहे. मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या राज्य दौर्याबाबत विचारलेल्या प्रश्नात त्यांनी सांगितले की, माझे प्राधान्य कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यावर आहे. कोणताही तणाव निर्माण होऊ नये म्हणून संपूर्ण राज्याचे मंत्री म्हणून काम करा, असे मी सर्व मंत्र्यांना सांगितले आहे.
कौटुंबिक संबंध महत्त्वाचे
मतभेद असले तरी कौटुंबिक संबंध महत्त्वाचे आहेत. कुटुंबात राजकारण आणू नये, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. राजकीय मतभेद असूनही उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांचे काका शरद पवार यांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी सहभागी झाल्याच्या प्रश्नाला फडणवीस यांनी उपरोक्त उत्तर दिले.