किमान तापमान : 27.87° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.82°से. - 30.57°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.82°से. - 30.41°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.75°से. - 30.46°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 31.02°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 30.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.49°से. - 30.08°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश*प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे सामुहिक दर्शन,
चंद्रपूर, (२२ जानेवारी) – अयोध्येत श्रीराम मंदिराच्या निर्माणीसाठी ‘सियावर रामचंद्र की जय’ म्हणत कारसेवेला जाण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. आज प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेने जीवनाचे सार्थक झाले आहे. या क्षणाचा आनंद शब्दांमध्ये वर्णन करणे शक्य नाही, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिरात सोमवार, २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. सुधीर मुनगंटीवार यांनी, येथील समाधी वॉर्ड परिसरातील काळाराम मंदिरात एलईडी स्क्रिनच्या माध्यामातून या ऐतिहासिक सोहळ्याचे सामुहिक दर्शन घेतले. त्यांनतर ते नागरिकांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी सपना सुधीर मुनगंटीवार, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, माजी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, विहिंप जिल्हाध्यक्ष रोडमल गहलोत, विहिंप प्रांत संत्सग प्रमुख राकेश त्रिपाठी, माजी महापौर अंजली घोटेकर, काळाराम मंदिराचे विश्वस्त विजय दोमलवार उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले, प्रभु रामचंद्राच्या आर्शीवादाने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगामध्ये भारताचा गौरव वाढविण्याचा संकल्प करून प्रयत्नरत आहेत. या मंदिर निर्माणकार्यात चंद्रपूरचेही योगदान आहे. मंदिराचे सर्व लाकडी काम हे चंद्रपूरच्या सागवानापासून झाले आहे, याचा आनंद आहे. मी श्रीरामाच्या डोळ्यात चंद्रपूरचा आर्शीवाद बघतो आहे. हा आर्शीवाद आमच्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण करेल, असा विश्वास आहे. तसेच त्यांनी, १९९२ मध्ये स्वत: केलेल्या कारसेवाचा अनुभवही यावेळी कथन केला. देवस्थान समितीच्या विनंतीवरून काळाराम मंदिराचे नूतनीकरण करून हे मंदिर भव्य करण्याची घोषणाही त्यांनी केली.
भाजपा व काळाराम देवस्थान समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात होते. सर्वप्रथम मुनगंटीवार यांनी श्रीरामाचे दर्शन घेऊन सपत्नीक पूजन व आरती केली. मंदिर देवस्थान कमिटीतर्फे मुनगंटीवार यांचा सत्कार करून त्यांना रामायणाची प्रत देण्यात आली. त्यानंतर मुनगंटीवार यांनी एलईडी स्क्रिनच्या माध्यामातून या ऐतिहासिक सोहळा सामुहिक अनुभवला. तसेच मुनगंटीवार यांच्या हस्ते कारसेवेसाठी कारसेवेसाठी अयोध्येत गेलेल्या कारसेवकांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी शैलेश बागला, शैलेंद्र शुक्ला, मनोहर टहलियानी, गणपत सत्रे, विवेक आंबेकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, शहरातील कारसेवक व रामभक्त उपस्थित होते.