किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 44 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल-विरोधी पक्ष कार्यकर्ते व नेत्यांशी चर्चा,
-स्थानिक स्तरावरही पक्षप्रवेश घडवणार,
नागपूर, (२५ जानेवारी) – भारतीय जनता पार्टीतर्फे लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून ४ ते ११ फेब्रुवारी संपूर्ण महाराष्ट्रात ‘गाव/शहर चलो अभियान’ राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. या अभियानात विरोधी पक्षातील नेते व पदाधिकार्यांची भेट घेतली जाणार असून स्थानिक स्तरावरही त्यांचे पक्षप्रवेश व्हावेत, असा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या अभियानासाठी प्रदेश, जिल्हा व मंडळ स्तरावर कार्यकर्त्यांनी प्रशिक्षण देण्यात आले आहे. पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या स्मृती दिनापासून हे अभियान सुरू होईल. भाजपाच्या गरीब कल्याण योजनांच्या माहितीचा प्रचार व प्रसार केला जाईल. जिल्हा समितीत १५ संयोजकांची निवड केली जाईल. अभियानात केंद्रीय, राज्य स्तरावरील सर्व पदाधिकारी, मंत्री, खासदार, आमदार यांचाही सहभाग राहील.
या अभियानात १ गाव- १ कार्यकर्ता, शहरी भागात १ बुथ- १ कार्यकर्ता २४ तास त्या बुथवर राहणार. ग्रामीण व आवशक्ता असेल त्या शहरी भागात कार्यकर्ता त्याच गावात कार्यकर्त्यांच्या घरी निवास करणार. या अभियानात समाजातील वेगवेगळ्या घटकांशी संपर्क करून संवाद साधतील. या अभियानाच्या माध्यमातून १० टक्के मतदान वाढविण्यावर प्रमुख कार्यकर्ते भर देणार आहेत. प्रमुख योजना व भाजपाच्या कामाची माहिती असलेले पत्रक वितरित करून स्टिकर्स लावले जातील. या प्रवासादरम्यान बुथवर खाजगी भिंतीवर विशेषतः कार्यकर्त्याच्या घरावर ‘फिरसे एक बार मोदी सरकार’ व भाजपाचे निवडणूक चिन्ह कमळ भिंतीवर रंगवतील.
या अभियानात भाजपाचे ज्येषठ कार्यकर्ते समाजातील प्रभावशाली व्यक्ती, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती, शेतकरी, क्रीडा क्षेत्र, धार्मिक स्थळांना भेटी, विविध लाभार्थ्यांच्या भेटी, जिल्हा परिषद, ग्राम पंचायत, पंचायत समितीच्या सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, अंगणवाडी, आशा सेविका, डाकसेवक, तलाठी आदींच्या भेटी-गाठी घेतील. दहशतवादी वा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवान व पोलिस यांच्या परिवाराच्या भेटी घेण्यात येणार आहेत. इतर पक्षातील नेते व कार्यकर्त्यांच्यासुद्धा भेटी-गाठ घेतल्या जातील. त्यांना भाजपाचा विचार समजावून सांगितला जाईल. सत्तापक्षबरोबर यायची तयारी असल्यास त्यांचाही पक्षप्रवेश केला जाईल. प्रदेश प्रवक्ते चंदन गोस्वामी, अश्विनी जिचकार, राम अंबुलकर, गुड्डू त्रिवेदी तसेच महानगर अध्यक्ष बंटी कुकडे पत्रकार परिषदेला उपस्थित होते.