किमान तापमान : 27.41° से.
कमाल तापमान : 29.8° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 3.05 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.8° से.
23.87°से. - 30.99°से.
रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल24.16°से. - 28.16°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.47°से. - 29.09°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 28.93°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.99°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल23.66°से. - 29.04°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा परखड सवाल,
मुंबई, (२५ जानेवारी) – सनातन हिंदू धर्माला संपविण्याची उद्दाम भाषा करणार्या उदयनिधी स्टॅलिन यांच्यासोबत इंडिया आघाडीमध्ये राहणे उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का? असा परखड सवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. उदयनिधी स्टॅलिन हे सनातन हिंदू धर्माला संपवण्याची भाषा वारंवार करीत आहेत. या विचारावरच जी इंडि आघाडी तयार झाली, त्या, बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे सामील आहेत. उदयनिधींची सनातन धर्माबद्दलची मते तुम्हाला मान्य आहेत का, हे उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावे, असे ते म्हणाले.
ज्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्ववादी विचारांना मूठमाती दिली, घराणेशाहीनुसार मु‘यमंत्री असताना स्वत:च्या मुलाला मंत्री केले, त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरे यांच्या हातातून सत्ता, पक्ष, कार्यकर्ते सगळेच निसटले. उद्धव यांच्या नाकर्तेपणामुळे पक्षाची अशी दयनीय अवस्था झाली आहे. म्हणूनच अस्वस्थ, विचलित मानसिक अवस्थेत उद्धव यांनी नाशिक येथे मोदी आणि भाजपा विरोधात गरळ ओकली, असे त्यांनी सांगितले. इंडिया आघाडीत ममता बॅनर्जी यांच्या पवित्र्यामुळे फूट पडल्याचे दिसून आले आहे. आगामी काळात एकीकडे इंडिया आघाडीची शकले होताना दिसतील तर, दुसरीकडे महाराष्ट्र भाजपात पक्षप्रवेशाचा झंझावात दिसून येईल, असेही त्यांनी नमूद केले.
उल्हास पाटील यांचा भाजपात प्रवेश
जळगावचे माजी खासदार आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. केतकी पाटील, धुळे जिल्ह्यातील बाळासाहेब भदाणे यांच्यासह काँग्रेस व उबाठा गटातील अनेक सरपंच, कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला.