Posted by वृत्तभारती
Sunday, March 3rd, 2024
मुंबई, (०२ मार्च) – महाराष्ट्रात गेल्या चार दशकांपासून पवार कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत यावेळी कौटुंबिक लढत होणार आहे. बारामती येथे आयोजित नमो रोजगार मेळाव्यात याची पुष्टी झाली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मंचावर बसल्या. या मेळाव्यात शरद पवार यांच्यासोबत विद्यमान खासदार सुप्रिया सुळेही व्यासपीठावर उपस्थित असल्या तरी कार्यक्रमात चर्चेचे आणि आकर्षणाचे केंद्र सुनेत्रा पवार यांची उपस्थिती होती. अजित पवार यांनी सुनेत्रा...
3 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, March 3rd, 2024
मुंबई, (०२ मार्च) – हा विषय अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील आहे. हिंसक वक्तच्याचे कोणीही समर्थन करू शकत नाही. हिंसा अथवा हिंसक वक्तव्याला लोकशाहीत कुठेही स्थान नाही. ज्याचा लोकशाहीवर विश्वास आहे, तो कधीही असा मार्ग अवलंबणार नसल्याचा विश्वास व्यक्त करीत, विधानसभाध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी संसदीय लोकशाहीला जपणे ही सभागृहाची जबाबदारी असून, त्यासाठी उपाययोजना करणे ही सरकारची जबाबदारी आहे. राज्यात किंवा देशात चुकीचा संदेश जाणे, अत्यंत घातक आहे. त्यामुळे शासनाने या...
3 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, February 25th, 2024
मुंबई, (२५ फेब्रुवारी) – लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाने त्यांच्यात ठरलेल्या जागा वाटपाची माहिती दोन दिवसांत जाहीर करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने एका पत्राद्वारे केली आहे. याबाबत वंचितने शनिवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दोन दिवसांच्या आत त्यांच्या जागासंदर्भात माहिती द्यावी, म्हणजे आम्हाला निर्णय घेणे सोपे जाईल. ही अंतिम मुदत...
25 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, February 24th, 2024
– शरद पवार यांनी पक्षाचे नवे निवडणूक चिन्ह केले जाहीर, मुंबई, (२४ फेब्रुवारी) – शरद पवार यांच्या पक्ष ’राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ या पक्षाला निवडणूक आयोगाकडून नवीन चिन्ह मिळाले आहे. नवीन निवडणूक चिन्हावर एक व्यक्ती ’ट्रम्पेट’ वाजवताना दिसत आहे. ’तुर्हा’ ही पारंपरिक शहनाई आहे. महाराष्ट्रात याला ’तुतारी’ म्हणतात. पक्षाचे नवीन चिन्ह मिळाल्याबद्दल राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार म्हणाले की, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पक्ष नवीन नाव आणि नवीन चिन्ह घेऊन लोकसभा निवडणूक...
24 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, February 24th, 2024
पुणे, (२४ फेब्रुवारी) – महाराष्ट्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातून एका १९ वर्षीय मुलाला अटक करण्यात आली आहे. या मुलाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपी मुलाला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ ने अटक केली. काय आहे संपूर्ण प्रकरण? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार श्रीकांत शिंदे यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. पोलिसांनी आरोपीला पुण्यातून अटक केली. सूत्रांनी दिलेल्या...
24 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, February 23rd, 2024
मुंबई, (२३ फेब्रुवारी) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. मुंबईतील रुग्णालयात शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८६ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बुधवारी पीडी हिंदुजा हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल होते. खासगी वैद्यकीय सुविधेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनोहर जोशी १९९५ ते १९९९ पर्यंत मुख्यमंत्री होते आणि...
23 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, February 19th, 2024
मुंबई, (१९ फेब्रुवारी) – महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये पुढील तीन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पश्चिमेकडून वाहणार्या वार्यातील स्थितीत बदल झाल्यामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासोबतच पंजाब, नवी दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि इतर काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, चंदीगड, लडाखमध्ये तीन दिवस पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात आज रात्रीनंतर दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा...
19 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, February 18th, 2024
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन, मुंबई, (१८ फेब्रुवारी) – कोल्हापूर अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव सेनेची मालमत्ता नको, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना हवी आहे, असे सांगितले. जुन्या घटनांचा संदर्भ देत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, जेव्हा पक्षाचे आमदार माझ्यासोबत आले तेव्हा माझ्यावर आणि आमच्या आमदारांवर ५० कोटी रुपये घेतल्याचे खोटे आरोप करण्यात आले. पण, मला सांगावेसे वाटते की, केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष आणि निवडणूक चिन्ह...
18 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, February 16th, 2024
मुंबई, (१५ फेब्रुवारी) – लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसला सलग तीन मोठे धक्के बसले आहेत. यानंतरही काँग्रेसमधील तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अलीकडेच मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दीकी यांच्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसच्या बैठकीला ६ आमदार पोहोचले नसल्याची बातमी समोर आली आहे. खरे तर, सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात सुरू झालेला राजीनाम्याचा फड थांबवण्यासाठी हायकमांड डॅमेज कंट्रोलमध्ये व्यस्त आहे. महिनाभरात तीन बड्या नेत्यांनी...
16 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 15th, 2024
– पुन्हा एकदा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल राज्यसभेचे उमेदवार, मुंबई, (१४ फेब्रुवारी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने बुधवारी (१४ फेब्रुवारी) प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेचे उमेदवार बनवण्याची घोषणा केली आहे. अजित पवार गटाने पुन्हा एकदा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर मोठा विश्वास व्यक्त केला असून त्यांना वरिष्ठ सभागृहात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख उद्या म्हणजेच १५ फेब्रुवारी आहे. अजित पवार गटाने उमेदवारी अर्ज...
15 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 13th, 2024
मुंबई, (१३ फेब्रुवारी) – काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी विधानसभा सदस्यत्वाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप मुंबईच्या कार्यालयात अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. चव्हाण यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून ते...
13 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 13th, 2024
– महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का, मुंबई, (१२ फेब्रुवारी) – लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे माजी नेते काही काळ पक्षावर नाराज होते. सूत्रांवर विश्वास ठेवला तर चव्हाण आता भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. दरम्यान, चव्हाण यांनी सोमवारी मुंबईत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. यानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली होती. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही वक्तव्य आले...
13 Feb 2024 / No Comment / Read More »