|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.74° से.

कमाल तापमान : 24.99° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 53 %

वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.99° से.

हवामानाचा अंदाज

23.55°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.63°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल

राष्ट्रवादीने महाराष्ट्रावर बलात्कार केला

राष्ट्रवादीने महाराष्ट्रावर बलात्कार केला=राज ठाकरेंचा हल्लाबोल= नाशिक, [१२ ऑक्टोबर] – बलात्कार करायचाच होता तर निवडणुकीनंतर करायचा’ या माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मनसे उमेदवाराबाबत केलेल्या वक्तव्याचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला असून, ‘छाती नाही, उंची नाही तरी हे महाराष्ट्राचे गृहमंत्री, या शब्दात आबांची खिल्ली उडविली. महाराष्ट्रातील माता-बहिणींचा अपमान करणारा हा गृहमंत्री. सत्तेचा माज आलेल्या या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काय या महाराष्ट्रावर कमी बलात्कार केला का? असा सवाल करतानाच या निवडणुकीत...13 Oct 2014 / No Comment / Read More »

विकासाच्या राजकारणाला साथ द्या : गडकरी

विकासाच्या राजकारणाला साथ द्या : गडकरीलातूर, उदगीर, [१२ ऑक्टोबर] – नरेंद्र मोदी यांनी क्षुद्र राजकारणाला मूठमाती देऊन विकासाच्या राजकारणाची देशात सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील जातीपातीचे राजकारण संपवून विकासाचे राजकारण सुरू करण्यासाठी भाजपाला साथ द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.लातूर येथे भाजपा उमेदवार शैलेश लाहोटी व उदगीर येथे भाजपा उमेदवार सुधाकर भालेराव यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर उमेदवार आ. सुधाकर भालेराव, जिल्हाध्यक्ष प्रा. नागनाथ निडवदे, खा. सुनील गायकवाड, रूपाताई पाटील...13 Oct 2014 / No Comment / Read More »

मोदींनी केली फडणवीस, अहिर यांची प्रशंसा

मोदींनी केली फडणवीस, अहिर यांची प्रशंसानागपूर, [७ ऑक्टोबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी नागपूर जिल्ह्यातील भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी कस्तूरचंद पार्कवर आयोजित विराट जाहीर सभेत प्रदेश भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रपूरचे खासदार हंसराज अहिर यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली. विशेष म्हणजे नरेंद्र मोदी हे कौतुकोद्‌गार काढत असताना देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर उपस्थित होते आणि अतिशय विनम्रपणे जनसमुदायाला अभिवादन करत याचा स्वीकार करत होते. आ. फडणवीस दक्षिण-पश्‍चिम नागपूर मतदारसंघातील उमेदवारही आहेत. देवेंद्र फडणवीस अतिशय...8 Oct 2014 / No Comment / Read More »

आघाडीच्या कार्यकाळात राज्य माघारले : गडकरी

आघाडीच्या कार्यकाळात राज्य माघारले : गडकरीनाशिक, [२९ सप्टेंबर] – राज्यात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस आघाडीच्या कार्यकाळात राज्य विकासाच्या दृष्टीने चांगलेच माघारले, शिवाय योग्यवेळी मदत न मिळाल्याने हजारो शेतकर्‍यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला, असा आरोप भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केला. विधानसभा निवडणुकीतील नंदूरबार मतदारसंघातील भाजपा उमेदवार विजयकुमार गावित यांच्या प्रचारार्थ रविवारी रात्री आयोजित जाहीर सभेत गडकरी बोलत होते. आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा ‘अकार्यक्षम प्रशासक’ असा उल्लेख करून नितीन गडकरी...30 Sep 2014 / No Comment / Read More »

भाजपा महायुतीलाच संपूर्ण बहुमत : फडणवीस

भाजपा महायुतीलाच संपूर्ण बहुमत : फडणवीसनागपूर, [२६ सप्टेंबर] – राज्यात निर्माण झालेल्या निराळ्या स्थितीचा विचार करता, भाजपा व सहकारी घटकपक्ष यांच्या भाजपा महायुतीच्या माध्यमातून येती विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सर्वत्र भाजपा महायुतीच्याच बाजूने वातावरण दिसत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीलाच संपूर्ण बहुमत मिळेल व ती सत्तास्थानी विराजमान होईल, असा विश्‍वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. दक्षिण-पश्‍चिम नागपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर सिव्हिल लाईन येथील प्रचार कार्यालयात शुक्रवारी...27 Sep 2014 / No Comment / Read More »

राज ठाकरेंची प्रकृती बिघडली

राज ठाकरेंची प्रकृती बिघडली=मुलाखती अर्धवट सोडून परतले हॉटेलात= औरंगाबाद, [१५ सप्टेंबर] – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज दुपारी अस्वस्थ वाटू लागले. यामुळे मुलाखती थांबवून राज ठाकरे विश्रांतीसाठी हॉटेलात निघून गेले. यामुळे आज आणि उद्याच्या मुलाखती होणार की नाही, याबाबत अनिश्‍चितता आहे. मराठवड्यातील विधानसभेच्या ४६ जागांसाठी आज राज ठाकरे इच्छूकांच्या मुलाखती घेत होते. जालना रोडवरील सागर लॉन येथे सकाळी ९ वाजतापासून मुलाखतींना...16 Sep 2014 / No Comment / Read More »

मुंडेंचे स्वप्न साकारण्यासाठीच संघर्षयात्रा

मुंडेंचे स्वप्न साकारण्यासाठीच संघर्षयात्रा=पंकजा मुंडे यांचे आवाहन, वाशीम शहरात जल्लोषात स्वागत= वाशीम, [३० ऑगस्ट] – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीने घवघवीत यश मिळवून केंद्रातील भ्रष्ट कॉंग्रेस आघाडी सरकार उलथवून टाकले. त्याच धर्तीवर आगामी विधानसभा निवडणुकीची लढाई आता आपल्याला जिंकायची आहे. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आणण्याचे स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपली आहे. त्यासाठी भाजपा महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी भ्रष्ट कॉंग्रेस – राकॉं आघाडीचे सरकार महाराष्ट्रातून घालवण्यासाठी जिद्दीने...31 Aug 2014 / No Comment / Read More »

नाशिक कुंभमेळा १९ ऑगस्टपासून

नाशिक कुंभमेळा १९ ऑगस्टपासून=आखाडा परिषदेची घोषणा= अयोध्या, [२२ ऑगस्ट] – महाराष्ट्रातील नाशिक येथे आयोजित कुंभमेळ्याला पुढील वर्षीच्या १९ ऑगस्ट रोजी प्रारंभ होईल, अशी घोषणा अयोध्या येथील प्रसिद्ध हनुमाग गढी मंदिराचे मुख्य पुजारी आणि आखाडा परिषदेचे प्रमुख महंत ज्ञान दास यांनी आज केली. कुंभमेळ्यादरम्यान होणार्‍या शाही स्नानाच्या तारखाही महंत ज्ञान दास यांनी जाहीर केल्या. नाशिक येथील कुंभमेळा पुढील वर्षीच्या १९ ऑगस्ट रोजी प्रारंभ होईल आणि २९ ऑगस्ट, १३ सप्टेंबर आणि १८ सप्टेंबर २०१५ रोजी...23 Aug 2014 / No Comment / Read More »

न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा : तावडे

न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा : तावडेऔरंगाबाद, [१० ऑगस्ट] – न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्यातील १८ हजार अंशकालीन शिक्षकांना सेवेत कायम करुन घेण्याऐवजी टोलवा टोलवी करणारे राज्यसरकार या आदेशाचे पालन करीत नाहीत, युतीची सत्ता येताच तुम्हाला कायम करु अशी ग्वाही विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सात दिवसांपासून उपोषणास बसलेल्या राज्य अंशकालीन शिक्षकांना रविवारी दिली. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात असलेल्या कार्यक्रमानिमित्त विनोद तावडे हे शहरात आले होते. या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गेल्या सात...11 Aug 2014 / No Comment / Read More »

जातीय कार्ड खेळणे कॉंगे्रसची सवयच

जातीय कार्ड खेळणे कॉंगे्रसची सवयच=महाराष्ट्र सदनातील घटना, नितीन गडकरी यांचा आरोप= नाशिक, [२६ जुलै] – निवडणुका आल्यानंतर जातीयतेचे कार्ड खेळणे कॉंगे्रस व राष्ट्रवादी कॉंगे्रसची जुनीच सवय आहे. महाराष्ट्रात तीन महिन्यांवर विधानसभेची निवडणूक असल्याने या दोन्ही कॉंगे्रसने महाराष्ट्र सदनातील घटनेला जातीय रंग देण्याचे प्रयत्न चालविले आहेत, असा आरोप केंद्रीय भुपृष्ठ परिवहन, राष्ट्रीय महामार्ग आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केला. महाराष्ट्र सदनातील प्रकार इतका गंभीर नव्हता. आपण ज्याला चपाती खायला सांगत आहो,...27 Jul 2014 / No Comment / Read More »

शोकसागरात बुडाले मुंडेंचे गाव

शोकसागरात बुडाले मुंडेंचे गावपरळी वैजनाथ, [३ जून] – गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच, मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथजवळ असलेले नाथ्रा हे त्यांचे गाव दु:खाच्या सागरात बुडाले. आपला लाडका नेता आता आपल्याला कधीच दिसणार नाही, या विचारानेच गावातील प्रत्येक व्यक्ती हळहळली होती. मुंडे यांच्या निधनाचे वृत्त वार्‍यासारखे पसरले. आणि लोक समुहा-समुहाने रस्त्यावर येत होते. या वृत्तावर नाथ्रा आणि परळी वैजनाथमधील कुणाचाही विश्‍वास बसत नव्हता. पण, अखेर वास्तव त्यांना स्वीकारावे लागले. प्रत्येकाच्याच घरातील...3 Jun 2014 / No Comment / Read More »

महाराष्ट्रात भाजपा रुजविणारा नेता हरपला

महाराष्ट्रात भाजपा रुजविणारा नेता हरपलाऔरंगाबाद, [३ जून] – महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात भाजपाची पाळेमुळे मजबूत करणारे आणि लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर महाराष्ट्राचा गड सर करण्याचा जणू निर्धारच व्यक्त करणारे भाजपाचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे आज सकाळी अचानक झालेले निधन महाराष्ट्राला आणि समाजमनाला धक्का देऊन गेले आहे. भाजपाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात रुजवणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. प्रमोद महाजन हे युतीचे, तर मुंडे महायुतीचे शिल्पकार आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना एक आठवड्यापूर्वीच केंद्र सरकारमध्ये ग्रामीण...3 Jun 2014 / No Comment / Read More »