किमान तापमान : 28.43° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 2.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
27.65°से. - 29.75°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल28.17°से. - 30.49°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.6°से. - 30.66°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.16°से. - 30.26°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.33°से. - 29.95°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.04°से. - 29.71°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनाशिक, [२९ सप्टेंबर] – राज्यात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस आघाडीच्या कार्यकाळात राज्य विकासाच्या दृष्टीने चांगलेच माघारले, शिवाय योग्यवेळी मदत न मिळाल्याने हजारो शेतकर्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला, असा आरोप भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केला.
विधानसभा निवडणुकीतील नंदूरबार मतदारसंघातील भाजपा उमेदवार विजयकुमार गावित यांच्या प्रचारार्थ रविवारी रात्री आयोजित जाहीर सभेत गडकरी बोलत होते.
आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा ‘अकार्यक्षम प्रशासक’ असा उल्लेख करून नितीन गडकरी यांनी सांगितले की, विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य देशात सहाव्या क्रमांकावर घसरले आहे. एवढेच नाही तर वीजटंचाई, अपुर्या सिंचन योजना यामुळे पिके बुडाल्याने दहा हजाराच्यावर शेतकर्यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला.
‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणाने राज्यात भाजपाचे सरकार काम करेल, अशी ग्वाही देऊन गडकरी यांनी सांगितले की, आगामी तीन महिन्यात अमरावती-सुरत या चौपदरी महामार्गाचे निर्माणकार्य सुरू करण्यात येणार आहे.
माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्यावरही टीका करताना गडकरी म्हणाले की, संपुआ शासन काळात कर्जाचा बोजा वाढल्यानेच शेतकर्यांना आत्महत्या कराव्या लागल्या. विकासाच्या मार्गावर पुन्हा अग्रेसर होण्यासाठी राज्यात १५ ऑक्टोबर रोजी होणार्या मतदानात भाजपाला भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.