|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 22.99° से.

कमाल तापमान : 24.08° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

22.99° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.53°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल

एलबीटी लवकरच रद्द होणार

एलबीटी लवकरच रद्द होणार=मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती= कोल्हापूर, [३ जानेवारी] – स्थानिक स्वराज संस्था कर अर्थातच एलबीटी रद्द करण्यासाठी आपले सरकार वचनबद्ध आहे. याबाबतची घोषणा लवकरच करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारी येथे दिली. पूर्वीच्या कॉंगे्रस आघाडी सरकारने जकातीला पर्याय म्हणून राज्यात एलबीटी लागू केला होता. पण, व्यापार्‍यांनी त्याला प्रखर विरोध दर्शविला. एलबीटी रद्द करण्याबाबत आपल्याला सखोल विचार करावा लागणार आहे. ठोस पर्याय आणावा लागणार आहे. त्यादृष्टीने आपले सरकार...4 Jan 2015 / No Comment / Read More »

भारत हिंदूराष्ट्र व्हावे : डॉ तोगडिया

भारत हिंदूराष्ट्र व्हावे : डॉ तोगडियावर्धा, [२५ डिसेंबर] – मोगलांच्या आक्रमणापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी काही हिंदूंनी मुस्लिम धर्म स्वीकारला. तर ख्रिश्‍चनही मुळात हिंदूच होते. याचा अर्थ आजचे मुस्लिम वा ख्रिश्‍चन आमचेच वंशज आहेत. दुर्दैवाने आज धर्मांतरण वाढत आहे. मात्र, आम्ही पुन्हा धर्मांतरण होऊ देणार नाही. हिंदूंना सुरक्षा, समृद्धी आणि सन्मान मिळावा, यासाठी भारत एक घटनात्मक हिंदूराष्ट्र बनावे आणि हिंदूराष्ट्राच्या आधारावरच शासन असावे, असे मत विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले....26 Dec 2014 / No Comment / Read More »

मनसेचे ४ माजी आमदार भाजपाच्या वाटेवर

मनसेचे ४ माजी आमदार भाजपाच्या वाटेवर=नववर्षात करणार प्रवेश= नाशिक, [२३ डिसेंबर] – राज ठाकरे यांच्या अवतीभवती असलेल्या ‘चापलुसी’ नेत्यांंच्या व्यवहाराला कंटाळलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चार माजी आमदार भाजपाच्या वाटेवर निघाले असून, नववर्षाच्या सुरुवातीलाच ते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास पराभवाच्या धक्क्यातून अद्याप न सावरलेल्या मनसेला हा फार मोठा धक्काच राहणार आहे. मनसेच्या या नेत्यांच्या पक्षप्रवेशाला स्थानिक भाजपा पदाधिकार्‍यांनी विरोध दर्शविला आहे. तथापि, प्रदेश भाजपाने या सर्वांना स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारीत भाजपाचे राष्ट्रीय...24 Dec 2014 / No Comment / Read More »

लातूर -उस्मानाबाद परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

लातूर -उस्मानाबाद परिसरात भूकंपाचा सौम्य धक्कालामजना, [१९ डिसेंबर] – लातूर – उस्मानाबाद जिल्हयांतील सीमेवरील किल्लारीसह लामजना, खरोसा, मंगरूळ, गुबाळ,लिंबाळा बाणेगावसह परिसरातील अनेक गावांना गुरूवारी रात्री ९.४२ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. भूकंपाच्या भीतीने आणि घरातील भांडयांच्या आवाजामुळे घरांतील लोक रस्त्यावर धावत आले,सर्वत्र धावपळ सुरू झाली. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाक्षी संपर्क साधला असता, भूकंप मापक यंत्रावर नोंद झाली नसल्यामुळे हा भूकंप नसून गूढ आवाज असल्याचे उपजिल्हाधिकारी सुनील यादव यांनी सांगितले. दरम्यान, उमरगा तालुक्यातील अनेक...20 Dec 2014 / No Comment / Read More »

गोपीनाथगड स्मारकाचे आज भूमिपूजन

गोपीनाथगड स्मारकाचे आज भूमिपूजन=मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती= परळी, [१२ डिसेंबर] – दिवंगत केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या प्रथम जयंतीनिमित्त पांगरी येथील बैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात गोपीनाथगड स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दुपारी ३ वाजता होणार आहे. के्रंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे समाधिस्थळ परळी तालुक्यातील पांगरी येथील बैद्यनाथ सहकारी साखर परिसरात आहे. याचठिकाणी गोपीनाथगड स्मारक उभारले जाणार आहे. यावेळी भगवानगडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री महाराज व राष्ट्रसंत भय्यू महाराज...12 Dec 2014 / No Comment / Read More »

कॉंग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाचा फज्जा

कॉंग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाचा फज्जा=शेतकर्‍यांची अत्यल्प उपस्थिती • युवा कार्यकर्त्यांनी फिरविली पाठ= नागपूर, [८ डिसेंबर] – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर शेतकर्‍यांच्या हिताच्या गोष्टी करणार्‍या कॉंग्रेसने सोमवारी विधानसभेवर काढलेला ‘हल्लाबोल’ मोर्चा पूर्णत: फसला. शेतकर्‍यांचे हित साधण्याचा आव आणणार्‍या कॉंग्रेसला अपेक्षेपेक्षा फारच कमी लोक जमवता आल्याने त्यांची स्थिती दयनीय झाली आहे. कॉंग्रेसला इतके वाईट दिवस का आले? असा प्रश्‍न पोलिसांना देखील पडला होता. चार दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी वार्तापरिषद घेऊन मोर्चात...9 Dec 2014 / No Comment / Read More »

कुंभमेळ्याला पुरेशी सुरक्षा देण्यासाठी याचिका

कुंभमेळ्याला पुरेशी सुरक्षा देण्यासाठी याचिकामुंबई, [९ नोव्हेंबर] – पुढच्या वर्षी नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या काठावर भरणार्‍या कुंभमेळाव्यात चेंगराचेंगरी किंवा दहशतवादी हल्ला होऊ नये, यासाठी पुरेशी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात यावी, अशा आशयाची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याआधी म्हणजे २००३च्या कुंभमेळाव्यात योजनेचा अभाव आणि पुरेशा मुलभूत सुविधा नसल्यामुळे २९ यात्रेकरूंना आपला जीव गमवावा लागला होता, तर ११८ जणांना गंभीर स्वरूपाच्या जखमांना...10 Nov 2014 / No Comment / Read More »

विदर्भातही येणार डेक्कन ओडीसी

विदर्भातही येणार डेक्कन ओडीसी=सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा, कर्ज आणि परतफेडीच्या दुष्टचक्रातून महाराष्ट्राला बाहेर काढण्याचा निर्धार= नागपूर, [९ नोव्हेंबर] – कालपर्यंत महाराष्ट्राच्या केवळ काही भागापुरतीच मर्यादित राहिलेली डेक्कन ओडीसी रेल्वे येत्या काळात विदर्भात आणण्याची आणि त्यातून देशविदेशातील पर्यटकांना या परिसरातल्या समृद्ध वन व निसर्गसंपदेचे दर्शन घडवीत येथील वनपर्यटन अधिक विकसित करण्याची घोषणा राज्याचे नवनियुक्त वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. रविवारी नागपुरातील भाजपा कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी अर्थमंत्री या नात्याने बोलताना सुधीर...10 Nov 2014 / No Comment / Read More »

गडकरींनी घेतले पाचगाव दत्तक

गडकरींनी घेतले पाचगाव दत्तक=खासदार आदर्श ग्राम योजना= नवी दिल्ली, [७ नोव्हेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील पाचगाव हे गाव दत्तक घेतले आहे. उमरेड मार्गावरील या गावाचा या योजनेंतर्गत २०१६ पर्यंत सर्वांगीण विकास केला जाणार आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जन्मदिनी म्हणजे ११ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ केला होता. देशातील प्रत्येक...8 Nov 2014 / No Comment / Read More »

प्रीतम मुंडेंचा विक्रमी मताधिक्याने विजय

प्रीतम मुंडेंचा विक्रमी मताधिक्याने विजय=मुलींनी राखला वडिलांचा गड= मुंबई, [१९ ऑक्टोबर] – दिवंगत केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या दोन्ही कन्यांनी आपल्या वडिलांचा अनुक्रमे बीड आणि परळी हा गड यशस्वीपणे कायम राखला आहे. विशेषत: प्रीतम मुंडे यांनी तर बीड लोकसभेची जागा विक्रमी ६.९२ लाखांच्या फरकाने जिंकली आहे. पंकजा मुंडे यांनी परळी विधानसभेची जागा आणि प्रीतम मुंडे यांनी बीड लोकसभेची जागा लढविली. पंकजा यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर रिंगणात उभा असलेला आपला चुलत भाऊ...21 Oct 2014 / No Comment / Read More »

परिवर्तनासाठी महिला सजग हवी : शांताक्का

परिवर्तनासाठी महिला सजग हवी : शांताक्काचंद्रपूर, [१६ ऑक्टोबर] – घरातील महिला सजग असेल, तर कुटुंबात आणि आपल्या शेजारील घरांमध्ये चांगले परिवर्तन घडू शकते, असे मत राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी व्यक्त केले. येथील मैत्रीय छात्रावासाला शांताक्का यांनी भेट दिली, त्यावेळी आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. यावेळी विदर्भ प्रांत कार्यवाहिका सुलभा गौड, सहकार्यवाहिका अंचल देशपांडे यांची उपस्थिती होती. यावेळी शांताक्का यांनी छात्रावासामधील सेविकांशी चर्चा केली. आजची परिस्थिती बघता मी, माझे कुटुंब, माझी जबाबदारी काय,...18 Oct 2014 / No Comment / Read More »

मनसे उमेदवाराचे ऐनवेळी शिवसेनेला समर्थन

मनसे उमेदवाराचे ऐनवेळी शिवसेनेला समर्थनपरभणी, [१४ ऑक्टोबर] – विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास उरलेले असतानाच, परभणी मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार ऍड. विनोद दुधगांवकर यांनी सोमवारी संध्याकाळी अचानक शिवसेनेच्या उमेदवाराला आपले समर्थन जाहीर करून सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. सेना-मनसेतील मतविभाजनाचा फायदा ओवैसीच्या मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन म्हणजे एमआयएमच्या उमेदवाराला होऊ नये, म्हणूनच हा निर्णय घेतल्याचे मनसे उमेदवाराने स्पष्ट केले आहे. मनसेचे परभणीचे उमेदवार विनोद दुधगावकर शिवसेना कार्यालयात पोहोचताच सर्वजण अवाक् झाले. आपण शिवसेना उमेदवार डॉ....15 Oct 2014 / No Comment / Read More »