किमान तापमान : 24.02° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.02° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=खासदार आदर्श ग्राम योजना=
नवी दिल्ली, [७ नोव्हेंबर] – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील पाचगाव हे गाव दत्तक घेतले आहे. उमरेड मार्गावरील या गावाचा या योजनेंतर्गत २०१६ पर्यंत सर्वांगीण विकास केला जाणार आहे.
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जन्मदिनी म्हणजे ११ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ केला होता. देशातील प्रत्येक खासदाराने आपल्या मतदारसंघातील एक गाव दत्तक घेऊन आरोग्य, शिक्षण, स्वच्छता यासह त्या गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारने केला आहे. या योजनेसाठी निर्धारित केलेल्या निकषात बसणारे गाव नागपूर लोकसभा मतदारसंघात नसल्यामुळे रामटेक लोकसभा मतदारसंघातील पाचगावची या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. नितीन गडकरी ४९२३ लोकसंख्येच्या या गावाचा आपल्या खासदार निधीतून विकास करणार आहेत.