किमान तापमान : 27.71° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.79°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशअयोध्या, (०१ नोव्हेंबर) – दिवाळी आणि अयोध्या या दोघांचे जुने नाते आहे. या दिवशी लोकांचे आराध्य दैवत श्री राम लंका जिंकून १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले. त्यामुळेच आजही अयोध्येची दिवाळी विशेष मानली जाते. यूपी सरकार दरवर्षी अयोध्येत दीपोत्सवाचे भव्य आयोजन करते. यंदाही अयोध्येत दीपोत्सव साजरा करून नवा विक्रम करण्याची तयारी सुरू आहे. उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री जयवीर सिंह यांनी सांगितले की, ११ नोव्हेंबर रोजी अयोध्या शहरात दिव्यांचा भव्य उत्सव आयोजित केला जाईल. ते म्हणाले की, दरवर्षी नवनवीन विक्रम करण्याचा आमचा प्रयत्न असतो. यावेळी आम्ही २१ लाखांहून अधिक दिवे लावू आणि आमचाच विक्रम मोडू, असे त्यांनी सांगितले. याआधी २०२० मध्ये ५,५१,००० दिवे, २०२१ मध्ये ७,५०,००० आणि २०२२ मध्ये १५,७६,००० दिवे लावून विक्रम नोंदवला गेला आहे.
श्री रामजन्मभूमी मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी नुकतीच राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख उघड केली आहे. चंपत राय यांनी सांगितले की, श्री रामजन्मभूमी मंदिरात भगवान श्री राम लल्ला सरकारच्या श्री विग्रहाचा अभिषेक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. यासाठी पीएम मोदींना अधिकृत निमंत्रण पत्रही देण्यात आले आहे. उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री जयवीर सिंह यांनी माहिती दिली आहे की, २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होईपर्यंत देशातील विविध राज्यांतील संघांकडून रामलीला सादर केली जाईल. अयोध्येत येणार्या भाविकांना कोणतीही अडचण किंवा गैरसोय होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.