किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.71°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादललखनौ, (०१ नोव्हेंबर) – अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी त्याच्याशी संबंधित आणखी रंजक माहिती समोर येत आहे. अयोध्येत भगवान श्रीरामांच्या जीवनावर आधारित रामायण दाखवण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अयोध्येत २०० फूट स्क्रीन बसवण्यात आली आहे. ही जगातील सर्वात मोठी स्क्रीन असल्याचे सांगितले जात आहे. यावर लाईट अँड साऊंड शो होणार आहे. याद्वारे प्रभू श्रीरामाच्या जीवनातील विविध प्रसंग दाखवण्यात येणार आहेत. या पडद्यावर रामायणाचे एपिसोड सतत चालवले जातील, पुढील ५ वर्षे असेच चालवण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे.
हा स्क्रीन रामच्या पौडीवर लावण्यात आला आहे. देश-विदेशातून येणार्या भाविकांना दररोज संध्याकाळी श्रीरामांना स्क्रीनवर पाहता येणार आहे. या स्क्रीनची ट्रायल रन ५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या कृती आराखड्याला जिल्हा प्रशासनाने मान्यता दिल्याचे सांगण्यात आले. दीपोत्सवापूर्वी हा लाइट अँड साऊंड शो सुरू होणार आहे. श्रीरामांना स्क्रीनवर २ हजारांहून अधिक लोक ते एकत्र पाहू शकतील.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. त्यानंतर राम मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे. दरम्यान, तेथे विविध तयारी सुरू आहे. तयारीबाबत चर्चा करताना उत्तर प्रदेशचे मंत्री जयवीर सिंह म्हणाले की, यावेळी ११ नोव्हेंबर रोजी दिव्यांचा उत्सव साजरा केला जाणार आहे. गतवेळी १७ लाख दिवे लावून गिनीज बुकमध्ये नाव नोंदवले होते, यावेळी हा विक्रम मोडण्यासाठी २१ लाख दिवे लावण्याचा कार्यक्रम आहे. दिवाळीपासून २२ जानेवारीपर्यंत अयोध्येत विविध रामलीलाही रंगणार आहेत. यासोबत सरयू नदीवर लेझर शो आदींचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.