|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 22.99° से.

कमाल तापमान : 24.08° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

22.99° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.53°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल

दोन अपत्य असणार्‍यांनाच सरकारी योजनांचा लाभ

दोन अपत्य असणार्‍यांनाच सरकारी योजनांचा लाभउत्तरप्रदेश, आसाम करणार कायदा, लखनौ/दिसपूर, २० जून – आगामी काळात उत्तरप्रदेश आणि आसाममध्ये दोन अपत्य असणार्‍या नागरिकांनाच सरकारी योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. उत्तरप्रदेशच्या राज्य कायदा आयोगाने लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वशर्मा यांनीही राज्य सरकारच्या काही खास सरकारी योजनांचा लाभ केवळ दोन अपत्य असणार्‍यांचा मिळेल, असे वक्तव्य शनिवारी रात्री केले आहे. आसाम सरकार यासाठी नीतिबद्ध आणि अनुक्रमिक पद्धतीने कार्य करणार आहे. आसामच्या...20 Jun 2021 / No Comment / Read More »

हेमंत बिस्वशर्मा आसामचे मुख्यमंत्री

हेमंत बिस्वशर्मा आसामचे मुख्यमंत्री१३ मंत्र्यांचाही झाला शपथविधी, गुवाहाटी, १० मे – ईशान्य लोकशाही आघाडीचे संयोजक हेमंत बिस्वशर्मा यांनी आज सोमवारी आसामचे पंधरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत भाजपाप्रणीत रालोआतील अन्य १३ मंत्र्यांचाही शपथविधी पार पडला. श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र सभागृहात आयोजित साध्या समारंभात राज्यपाल जगदीश मुखी यांनी बिस्वशर्मा आणि इतर मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. आसामला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकारण्यासाठी माझे सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी...11 May 2021 / No Comment / Read More »

हेमंत बिस्वशर्मा आसामचे नवे मुख्यमंत्री, आज शपथविधी

हेमंत बिस्वशर्मा आसामचे नवे मुख्यमंत्री, आज शपथविधीभाजपा विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड, गुवाहाटी, ९ मे – ईशान्य लोकशाही आघाडीचे संयोजक हेमंत बिस्वशर्मा यांची आज रविवारी भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. यामुळे तेच आसामचे नवे मुख्यमंत्री देखील राहणार आहेत. यानंतर बिस्वशर्मा यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला. उद्या सोमवारी ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. विधिमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यासाठी नियुक्त असलेले भाजपाचे निरीक्षक आणि केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी याबाबतची...9 May 2021 / No Comment / Read More »

ईशान्य भारताला भूकंपाचे तीव्र धक्के

ईशान्य भारताला भूकंपाचे तीव्र धक्केउत्तर बंगाल, बिहारही थरारला, नवी दिल्ली, २८ एप्रिल – आसामच्या गुवाहाटीसह ईशान्य भारताला आज बुधवारी सकाळी झालेल्या भूकंपाच्या शक्तिशाली धक्क्यांनी हादरवून टाकले. सकाळी ७.५५ वाजताच्या सुमारास जाणवलेल्या पहिल्या जोरदार धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ नोंदविण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदू आसामच्या सोनितपूर भागात होता, तर गुवाहाटीमध्ये भूकंपाची तीव्रता ४.३ होती. या भागांना एकापाठोपाठ भूकंपाचे सहा धक्के बसले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, आसामच्या तेजपूरजवळ पहिला धक्का सकाळी ७.५१ वाजता बसला....28 Apr 2021 / No Comment / Read More »

भाजपाकडून बोडोलॅण्डचा अडथळा दूर करण्याचा प्रयत्न

भाजपाकडून बोडोलॅण्डचा अडथळा दूर करण्याचा प्रयत्नगुवाहाटी, ५ एप्रिल – मागील १५ वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवरील पक्षांना बोडोलॅण्डमध्ये राजकीय जम बसवणे कठीण झाले आहे. भाजपा आता येथील अडथळा दूर करून या भागात उपस्थिती नोंदवण्याचा प्रयत्न करीत आहे. बक्सा, चिरंग, कोकराझार आणि उदलगुरी या बोडोलॅण्ड प्रादेशिक क्षेत्रातील (बीटीआर) विधानसभा मतदारसंघाच्या १२ जागांपैकी २ जागा यापूर्वी कॉंग्रेसला जिंकणे शक्य झाले होते. बोडोलॅण्ड पीपल्स फ्रंटचा (बीपीएफ) बीटीआरमध्ये दबदबा आहे. २०१६ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाने भाजपासोबत युती केल्याने कॉंग्रेसला...5 Apr 2021 / No Comment / Read More »

भाजपा उमेदवाराच्या वाहनात आढळले इव्हीएम

भाजपा उमेदवाराच्या वाहनात आढळले इव्हीएम४ अधिकारी निलंबित, गुवाहाटी, २ एप्रिल – आसामच्या पाथरकंडी विधानसभा मतदारसंघात भाजपा नेत्याच्या वाहनात इव्हीएम आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चार अधिकार्‍यांना निवडणूक आयोगाने निलंबित केले आहे. दरम्यान, या भाजपा उमेदवाराचे नामांकन रद्द करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. आसाममध्ये गुरुवारी दुसर्‍या टप्प्यातील ३९ जागांसाठी मतदान घेण्यात आले. दिवसभरातील मतदान प्रकियेनंतर भाजपा उमेदवाराच्या वाहनात इव्हीएम आढळल्याची घटना उघडकीस आली. एएस१०बी/००२२ असा या वाहनाचा क्रमांक आहे. कारमधील इव्हीएमची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित...2 Apr 2021 / No Comment / Read More »

पहिल्या टप्प्यानंतर राजकीय पक्षांचे मानसिक दबावतंत्र

पहिल्या टप्प्यानंतर राजकीय पक्षांचे मानसिक दबावतंत्रभाजपा-कॉंग्रेसकडून दावे, प्रतिदावे, गुवाहाटी, ३० मार्च – आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात मतदान झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आता १ आणि ६ एप्रिल रोजी होणार्‍या दुसर्‍या टप्प्यासाठी मानसिक दबावतंत्र सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यातील सर्वच ४७ जागा भाजपा जिंकणार असल्याची जाहिरात आसाममधील सर्वच मोठ्या वर्तमानपत्रांत झळकली आहे. कॉंग्रेसचा सहकारी पक्ष ऑल इंडिया डेमोक्रॅटिक फ्रंटच्या (एआययूडीएफ) बद्रुद्दिन अजमल यांनी कॉंग्रेस आघाडी ३० जागा जिंकणार असल्याचा दावा ट्विटच्या माध्यमातून केला. आसाममधील...30 Mar 2021 / No Comment / Read More »

आसाममध्ये चहा कामगारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न

आसाममध्ये चहा कामगारांना आकर्षित करण्याचे प्रयत्नगुवाहाटी, २५ मार्च – आसाममध्ये सर्वच राजकीय पक्षांकडून चहा मळ्यांतील कामगारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यातील मतदारांमध्ये चहा मळ्यांतील कामगारांची संख्या मोठी असल्याने, त्यांना विविध वचने राजकीय पक्षांकडून दिली जात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्ताधारी भाजपा, या पक्षाला आव्हान देणारा कॉंग्रेस पक्षाव्यतिरिक्त स्थानिक आसाम गण परिषद आणि आसाम जातीय परिषद येथील चहा मळे असलेल्या आठ जिल्ह्यांमध्ये कामगारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहे. विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा २७ मार्च...25 Mar 2021 / No Comment / Read More »

एनआरसीत दुरुस्त्या, नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी करणार

एनआरसीत दुरुस्त्या, नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी करणारभाजपाच्या आसाममधील संकल्पपत्रात वचन, गुवाहाटी, २३ मार्च – भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मंगळवारी संकल्पपत्र जारी केले आहे. आसाममध्ये एनआरसीत दुरुस्त्या केल्या जातील आणि नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी केली जाईल तसेच तरुणांना रोजगार व विद्यार्थिनींना सायकल वाटप केले जाईल, असे वचन भाजपाने या संकल्पपत्रात दिले आहे. येत्या पाच वर्षांत आसाममधील नागरिकांना मोठी झेप घेता यावी यासाठी भाजपा १० वचने देत असल्याचे नड्डा यांनी संकल्पपत्र जारी करताना सांगितले. नागरिकत्व कायदा...23 Mar 2021 / No Comment / Read More »

कॉंग्रेसचे खायचे व दाखवायचे दात वेगळे : जे.पी. नड्डा

कॉंग्रेसचे खायचे व दाखवायचे दात वेगळे : जे.पी. नड्डातिंगखॉंग, २२ मार्च – कॉंग्रेसचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असा घणाघात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोमवारी आसाममध्ये केला. कॉंग्रेस संधिसाधूपणाचे राजकारण करीत आहे. हा पक्ष सत्तेत आल्यास आसाम अंधाराच्या गर्तेत जाईल, असेही त्यांनी दिब्रुगढ जिल्ह्यातील तिंगखॉंग मतदारसंघात प्रचार करताना सांगितले. आसाममधील नागरिकांचे संरक्षण आणि त्यांची सेवा करण्यासाठी भाजपाने नेहमीच पुढाकार घेतला, असे त्यांनी सांगितले. संधिसाधूपणाचे राजकारण हेच केवळ कॉंग्रेसचे उद्दिष्ट आहे. या पक्षाने केरळात भाकपाच्या...23 Mar 2021 / No Comment / Read More »

कॉंग्रेस सर्वाधिक भ्रष्ट पक्ष

कॉंग्रेस सर्वाधिक भ्रष्ट पक्षस्मृती इराणी यांचा आसाममध्ये घणाघात, मरियानी, १३ मार्च – कॉंग्रेस हा सर्वाधिक भ्रष्ट पक्ष आहे, असा घणाघात करताना, केंद्र आणि राज्याच्या विविध कल्याणकारी योजनांचा फायदा घ्यायचा असेल, तर भाजपाला मतदान करा, असे आवाहन केंद्रीय वस्त्रोद्योग, महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज शनिवारी येथे झालेल्या त्यांच्या पहिल्या प्रचारसभेत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी राज्यातील गरीब नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत. कॉंग्रेस हा सर्वाधिक...13 Mar 2021 / No Comment / Read More »

आघाडीसाठी कॉंग्रेसने सोडल्या जागा

आघाडीसाठी कॉंग्रेसने सोडल्या जागाआसाम | गुवाहाटी, १० मार्च – भाजपाला रोखण्यासाठी आसाममधील आघाडीतील जागा सोडण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला असला, तरी यामुळे संघटनात्मक पातळीवर आधीच कमकुवत असलेल्या कॉंग्रेसचे नुकसान होणार आहे. या पक्षाने आसाममध्ये जवळपास ५० वर्षे सत्ता गाजवली आहे. पक्षातील असंतोष नव्हे, तर एक व्यापक चित्र डोळ्यासमोर ठेवून कॉंग्रेसने हा निर्णय घेतला असल्याची माहिती पक्षाने दिली आहे. अल्पसंख्यकबहुल धुब्री जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एआययूडीएफ आघाडीला महत्त्वाच्या जागा देण्याच्या निर्णयाविरोधात मंगळवारी आसाममधील कॉंग्रेसचे मुख्यालय राजीव...10 Mar 2021 / No Comment / Read More »