किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.93° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.93° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलजयपूर, (०२ नोव्हेंबर) – राजस्थानच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १५ लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली मणिपूरच्या इंफाळ येथे तैनात असलेल्या ईडी अधिकार्याला आणि त्याच्या एका सहकार्याला अटक केली आहे. चिटफंड प्रकरणात तक्रारदाराविरुद्ध दाखल केलेला गुन्हा निकाली काढण्यासाठी आरोपी अधिकार्याने १७ लाख रुपयांची मागणी केली होती. अधिकार्यांनी ही माहिती दिली आहे
लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने एका निवेदनात म्हटले आहे की, अटक करण्यात आलेल्यांची नावे नवलकिशोर मीणा, इम्फाळमधील अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) अंमलबजावणी अधिकारी आणि बाबुलाल मीणा, त्यांचा स्थानिक सहकारी अशी आहेत. तक्रारदाराने राज्य तपास यंत्रणेला कळवले होते की नवल किशोर मीणा आपल्याविरुद्ध इंफाळ येथील ईडी कार्यालयात नोंदवलेल्या खटल्याचा निपटारा करण्यासाठी १७ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. दरम्यान, एसीबीने तक्रारदाराच्या तक्रारीवरून कारवाई करत अधिकार्याला १५ लाख रुपयांची लाच घेताना अटक केली. नवल किशोर हा जयपूर जिल्ह्यातील बस्सी येथील विमलपुरा गावचा रहिवासी असल्याची माहिती आहे, तर त्याचा सहकारी बाबूलाल हा नव्याने स्थापन झालेल्या कोटपुल्टी-बेहरोर जिल्ह्यातील मुंडावार येथील उपनिबंधक कार्यालयात कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहे.