किमान तापमान : 29.33° से.
कमाल तापमान : 30.02° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.33° से.
27.34°से. - 30.76°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– जमावाच्या हल्ल्यानंतर स्थिती शांत, तणाव कायम,
इम्फाळ, (०२ नोव्हेंबर) – मणिपूर रायफल्सच्या छावणीतील शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न करणार्या दोन हजाराहून अधिक लोकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी हवेत बंदुकीच्या अनेक फैरी झाडल्यानंतर गुरुवारी मणिपूरची राजधानी इम्फाळमधील परिस्थिती शांत पण तणावपूर्ण होती. शहरातील अनेक बाजारपेठा बंद राहिल्या. परंतु, शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये आणि मणिपूर उच्च न्यायालय सामान्यपणे कार्यरत होते. सकाळी १० वाजतापासून संचारबंदी शिथिल झाल्यानंतर रस्त्यावर वाहने धावताना दिसली. प्रशासनाने प्रमुख ठिकाणांवर अतिरिक्त राज्य आणि केंद्रीय सैन्य तैनात केले आणि मणिपूर रायफल्स शिबिराजवळील भागात पोलिस कर्मचारी गस्त घालताना दिसले.
राज्य पोलिसांनी गुरुवारी सांगितले की, सशस्त्र हल्लेखोरांचा एमआर बटालियनमध्ये शस्त्रे आणि दारूगोळा लुटण्याचा कालचा प्रयत्न संयुक्त सुरक्षा दलांनी प्रभावीपणे हाणून पाडला. बुधवारी इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील राजभवन आणि मु‘यमंत्री कार्यालयाजवळील मणिपूर रायफल्सच्या छावणीला जमावाने लक्ष्य केले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी इम्फाळ पूर्व आणि पश्चिममधील पहाटे ५ ते रात्री १० वाजेपर्यंतची संचारबंदीत असलेली सूट त्वरित मागे घेतली.
तथापि, जिल्हा दंडाधिकार्यांनी इम्फाळ पूर्वमध्ये संचारबंदी गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शिथिल केली. इम्फाळ पश्चिमध्येही सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली. गुरुवारी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत लोकांच्या त्यांच्या निवासस्थानाबाहेरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परंतु, कोणत्याही मेळाव्याला किंवा मोठ्या प्रमाणात लोकांच्या एकत्र येण्याला, आंदोलने किंवा बेकायदेशीर रॅलीत सहभागी होण्यावर बंदी राहणार आहे, असे सरकारी आदेशात म्हटले आहे.