किमान तापमान : 23.25° से.
कमाल तापमान : 23.77° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.25° से.
22.99°से. - 28.49°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.46°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.66°से. - 28.57°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.19°से. - 28.07°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल22.54°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल22.51°से. - 26.58°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादलगुवाहाटी, २६ डिसेंबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ईशान्य भारत आता देशाच्या विकासाचे इंजिन झाला आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज शनिवारी येथे काढले.
पंतप्रधान मोदी यांनी ईशान्य राज्यांना नेहमीच देश विकासाचे महत्त्वाचे केंद्र मानले आहे. मागील सहा वर्षांच्या काळात त्यांनी या भागाला ३० वेळा भेट दिली आणि प्रत्येक भेटीत त्यांनी या भागासाठी काही तरी मोठी भेट आणली आहे, असे शाह यांनी विविध प्रकल्पांचे शुभारंभ करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात सांगितले.
मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या मार्गदर्शनात विकास व शांततेची नवी उंची गाठली आहे. आधी या राज्याची ओळख हिंसाचार आणि आंदोलन इतकीच होती, पण सोनोवाल यांच्या नेतृत्वात राज्यातील जनता एकत्र आली आणि आसामची खरी ओळख जगापुढे आली. अलीकडेच बोडोलॅण्ड प्रांतीय परिषदेसाठी निवडणूक घेण्यात आली. यात भाजपाने मोठे यश मिळाले. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही ‘सेमीफायनल’च होती. पुढील निवडणूक कोण जिंकणार, हेच मतदारांनी यातून दाखवून दिले आहे, असे ते म्हणाले.
बंडखोरांपासून आसाम मुक्त झाले
आसामात आधी अनेक बंडखोर संघटना सक्रिय होत्या. अलीकडील काळात अनेक बंडखोर गटांनी शरणागती पत्करली. शांततेचा मार्ग किती आवश्यक असतो, याचे महत्त्व त्यांना पटले आणि हे गट मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सहभागी झाले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.