किमान तापमान : 24.09° से.
कमाल तापमान : 24.29° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 4.06 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.09° से.
23.93°से. - 28.21°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.88°से. - 28.16°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.85°से. - 28.29°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.36°से. - 26.86°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.11°से. - 27.74°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल23.04°से. - 26.29°से.
रविवार, 01 डिसेंबर टूटे हुए बादलजम्मू, २६ डिसेंबर – लष्कर-ए-तोयबाचीच एक शाखा असलेल्या द रेसिस्टन्स फोस या गटाच्या दोन अतिरेक्यांना सुरक्षा दलाच्या जवानांनी आज शनिवारी सकाळी अटक केली. त्यांच्याजवळून दोन एके रायफल्स आणि काही स्फोटके जप्त करण्यात आली आहे. रईस अहमद दार आणि सुबझार अहमद शेख अशी या अतिरेक्यांची नावे असून, दोघेही कारने श्रीनगरकडे जात असताना, जवान आणि पोलिसांनी पाठलाग करून, नरवाल पासजवळ त्यांना बेड्या ठोकल्या, अशी माहिती पोलिस प्रवक्त्याने दिली.
काही अतिरेकी कारने श्रीनगरकडे येत असून, मोठ्या हल्ल्याचा त्यांचा कट आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्यानंतर या मार्गावर ठिकठिकाणी तपास नाके बसविण्यात आले होते. प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात असताना एका ऑल्टो कारने पळ काढला. जवानांनी पाठलाग करून कार पकडली आणि दोन अतिरेक्यांना अटक केली, असे प्रवक्ता म्हणाला. त्यांच्याजवळून मोठ्या पिशवीत दोन एके रायफल, एक पिस्तूल, ६० काडतुसे आणि काही हातबॉम्ब आढळून आले, असे प्रवक्त्याने सांगितले.
दोन अतिरेकी ठार
श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या शोपियॉं जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन अतिरेक्यांना चकमकीत ठार केले. घटनास्थळावरून शस्त्र आणि स्फोटकांचा साठाही जप्त करण्यात आला आहे.
शोपियॉंजवळील एका गावात काही अतिरेकी आल्याची माहिती मिळाल्यांतर लष्करी जवान आणि पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी मोहीम हाती घेतली होती. जवानांना पाहताच अतिरेक्यांनी गोळीबार केल्याने, झडलेल्या चकमकीत एक अतिरेकी ठार झाला होता. रात्र झाल्याने जवानांनी रात्रभव घेराव कायम ठेवला होता. आज सकाळी पुन्हा चकमक सुरू झाल्यानंतर आणखी एका अतिरेक्याला ठार मारण्यात आले, असे लष्करी प्रवक्त्याने सांगितले. या अतिरेक्यांची ओळख अद्याप पटली नसली तरी ते अल बद्रचे सदस्य असल्याचे प्रवक्ता म्हणाला.