किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 25.09° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 3.17 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.91°से. - 28.21°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल23.88°से. - 28.16°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.85°से. - 28.29°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.36°से. - 26.86°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.11°से. - 27.74°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल23.04°से. - 26.29°से.
रविवार, 01 डिसेंबर टूटे हुए बादलनवी दिल्ली, २६ डिसेंबर – राजधानी दिल्लीत यंदाच्या वर्षात जवळपास ५१ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. कमी तीव्रता असल्याने जीवित हानी झाली नसली, तरी भविष्यात मोठे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा भूगर्भ अभ्यासकांनी दिला आहे.
धनबाद आयआयटीमधील भूकंप विज्ञान विभागप्रमुख पी.के. खान यांच्यानुसार, कमी तीव्रतेच्या भूकंपाचे वारंवार धक्के बसत असतील, तर एक मोठा भूकंप येण्याचे संकेत समजले जातात. मागील दोन वर्षांत दिल्ली-एनसीआरमध्ये ४ ते ४.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या तब्बल ६४ धक्क्यांनी जमीन हादरली. यात ५ रिश्टर स्केल वा त्यापेक्षा जास्त तीव्रता असलेले भूकंप आठ वेळा आले होते. याचाच अर्थ दिल्ली-हरिद्वार रिजवर कायम हालचाली होत आहेत. डेहराडून येथील वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जियोलॉजीचे प्रमुख डॉ. के. सेन यांच्या मते, दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचा इतिहास फार जुना आहे. या क्षेत्रात वारंवार धक्के जाणवत असून, ते कमी तीव्रतेचे आहेत. मात्र, एका मोठ्या नुकसानीचे कारण बनू शकतात.
काही उपाययोजना
दिल्ली-एनसीआर क्षेत्र सीस्मिक झोन-४ मध्ये येत असून, याठिकाणी भूकंपाचा धोका अधिक असतो. तसेच, दिल्लीचा जवळपास ३० टक्के भाग झोन-५ मध्ये येत असून या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. त्यामुळे या क्षेत्रातील इमारती भूकंपरोधक तंत्रज्ञानानुसार निर्माण कराव्यात. प्रत्येक बांधकामावर लक्ष ठेवावे, ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडड्र्सच्या नियमावलीनुसार बांधकामाची तपासणी करावी, अशा उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे दिल्ली भूकंपाच्या दृष्टीने सर्वात जास्त संवदेनशील हिमालयन रिझनपासून केवळ २०० किलोमीटर अंतरावर आहे.