किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.69° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 2.94 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.58°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 29.1°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 28.81°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.93°से. - 29.28°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.59°से. - 28.72°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल22.96°से. - 28.47°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलगडकरी यांची ग्वाही,
जौनपूर, २० डिसेंबर – उत्तरप्रदेशातील रस्ते अमेरिकेच्या धर्तीवर विकसित करू, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज सोमवारी दिली. तुम्ही योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ अनुभवला आहे. आता पुढील पाच वर्षे नवे चमत्कार बघणार आहात. त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवा, असे गडकरी यांनी सांगितले.
एकीकडे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका वढेरा यांनी जनसंपर्काचा धडाका लावला असताना, सत्ताधारी भाजपाने विकासकामांच्या उद्घाटनांचा आणि नवीन कामांच्या भूमिपूजनाचा सपाटा लावला आहे. नितीन गडकरी यांनी सोमवारी मिर्झापूर येथे ३ हजार ३७ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या चार महामार्गांचे लोकार्पण केले तर, जौनपूर येथे तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यावेळी उपस्थित होते. मी कधीच खोटे बोलत नाही. जे बोलतो ते करून दाखवतो. म्हणूनच आज तुम्हाला मी एक वचन देत आहे, शब्द देत आहे. तुम्ही पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांच्यावर विश्वास दाखवा आणि पाहा, उत्तरप्रदेशातील रस्ते यूरोपीयन दर्जाचे नाही तर अमेरिकन दर्जाचे होतील. हे काम मी करेन, असे गडकरी म्हणाले.
प्रभू श्रीरामांची नगरी अयोध्येला जोडणार्या रस्त्यांचे जाळे विणायचे आहे. देशाच्या कानाकोपर्यातून अयोध्येला येण्याचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी अनेक प्रकल्प विचाराधीन आहेत. माझ्या मंत्रालयाकडे भरपूर पैसा आहे. राज्ये पैसा मागून थकतील, पण आम्ही थकणार नाही, असेही गडकरी म्हणाले.