किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.96° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 3.61 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 28.17°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.25°से. - 28.57°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.42°से. - 28.53°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.23°से. - 28.31°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.73°से. - 28.08°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल23.39°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादलपंतप्रधान मोदी यांचा नवा नारा, गंगा एक्सप्रेस-वेची पायाभरणी,
शाहजहानपूर, १८ डिसेंबर – उत्तरप्रदेशात आज माफियांवर बुलडोझर चालते, बेकायदेशीर इमारती बुलडोझरच्या माध्यमातून उद्ध्वस्त केल्या जातात. मात्र, त्याच्या वेदना माफियांना वरदहस्त देणार्यांना होतात. त्यामुळे उत्तरप्रदेशातील नागरिक आज युपी+योगी=उपयोगी, असे म्हणत आहेत. स्थितीत सुधारणा व्हावी, यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील सरकारने मागील चार वर्षांत खूप परिश्रम घेतले आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी केले.
त्यांच्या हस्ते आज शनिवारी ५९४ कि. मी. लांबीच्या गंगा एक्सप्रेस-वेची पायाभरणी करण्यात आली. शेतकरी आणि युवकांसह उत्तरप्रदेशातील प्रत्येकाला गंगा एक्सप्रेस-वेच्या माध्यमातून कित्येक संधी उपलब्ध होणार आहेत. या एक्सप्रेस-वेच्या माध्यमातून उत्तरप्रदेशच्या विकासाची दारे उघडली जाणार आहेत. राज्यातील हजारो युवकांना याच्या माध्यमातून रोजगाराच्या काही नवीन संधी उपलब्ध होऊन कित्येकांना रोजगार मिळणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. मेरठ, हापूर, बुलंदशहर, अमरोहा, संभल, बदाऊ, शाहजहानपूर, हरदोई, उन्नाव, रायबरेली, प्रतापगड आणि प्रयागराज येथील प्रत्येक नागरिकाचे मी अभिनंदन करतो. जवळपास ६०० कि. मी. लांबीच्या या महामार्गावर ३६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च केला जाणार आहे. गंगा एक्सप्रेस-वेमुळे या परिसरात नवीन उद्योग येतील, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
उत्तरप्रदेशला आधुनिक राज्य म्हणून ओळखले जाईल. येथे पुढील पिढीतील पायाभूत सुविधा असतील, तो दिवस जास्त दूर नाही. उत्तरप्रदेशात एक्सप्रेस-वेचे व्यापक जाळे विणले जात आहे, नवीन विमानतळ उभारले जात आहे, नवीन रेल्वेमार्ग टाकले जात आहेत. नागरिकांसाठी या माध्यमातून आनंद आणला जात आहे, असे मोदी यांनी सांगितले.
नागरिकांचा पैसा विकासासाठीच
संसाधनांचा कसा वापर करावा, हे उत्तरप्रदेशातील आधुनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून दिसून आले आहे. नागरिकांच्या पैशांचा वापर कसा व्हायचा, हे तुम्ही यापूर्वी पाहिले आहे. मात्र, आता उत्तरप्रदेशातील पैसा या राज्याच्या विकासासाठी वापरला जात आहे, असे मोदी यांनी सांगितले.