किमान तापमान : 26.3° से.
कमाल तापमान : 26.93° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 44 %
वायू वेग : 2.85 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.3° से.
25.41°से. - 28.17°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.25°से. - 28.57°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.42°से. - 28.53°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.23°से. - 28.31°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर घनघोर बादल23.73°से. - 28.08°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल23.39°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर छितरे हुए बादलउत्तरप्रदेशात कॉंग्रेसची अवस्था बिकट,
लखनौ, १६ डिसेंबर – पुढील वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर कॉंग्रेसने ४० टक्केमहिलांना उमेदवारी देण्याची अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. पण, कॉंग्रेसची ही घोषणा हवेत विरते की काय, अशी चिन्हे आहेत. उत्तरप्रदेशात कॉंग्रेसला महिला उमेदवारच मिळत नसल्याने भाजपावर मात करण्यासाठी टाकलेला हा डाव कॉंग्रेसवरच उलटताना दिसत आहे.
उत्तरप्रदेशात होणार्या विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवसांत अधिसूचना जारी होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. कॉंग्रेसनेही ही निवडणूक मनावर घेतली असून, त्यासाठी विशेष रणनीती आखली आहे. स्वत: कॉंग्रेस नेत्या प्रियांका वढेरा या उत्तरप्रदेश निवडणुकीत विशेष लक्ष घालत आहे. प्रियांकांनी ही घोषणा केल्यानंतर इतर पक्ष बॅकफूटवर गेले होते. दुसरीकडे प्रियांका यांनी केलेली घोषणा कॉंग्रेससाठी अडचणीचीही ठरताना दिसत आहे. कारण कॉंग्रेसला राज्यात महिला उमेदवारच मिळत नसल्याचे दिसत आहे.
उत्तरप्रदेशातील कॉंग्रेसच्या छाननी समितीकडे आलेल्या अर्जांत महिला उमेदवारांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे कॉंग्रेस नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्यास इच्छुकांना सांगितले होते. त्यासाठी ११ हजार रुपये शुल्कही ठेवले होते. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता कॉंग्रेसच्या नेत्यांनाच महिला उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार असल्याची चिन्हे आहेत.