|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:39 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.99° से.

कमाल तापमान : 25.35° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 61 %

वायू वेग : 2.35 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.99° से.

हवामानाचा अंदाज

24.27°से. - 28.58°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.07°से. - 29.1°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.12°से. - 28.81°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.93°से. - 29.28°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.59°से. - 28.72°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल
हवामानाचा अंदाज

22.96°से. - 28.47°से.

शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल
Home » दिल्ली, राज्य » लाल किल्ल्याचा ताबा मागणारी मुघल वंशजांची याचिका फेटाळली

लाल किल्ल्याचा ताबा मागणारी मुघल वंशजांची याचिका फेटाळली

नवी दिल्ली, २१ डिसेंबर – लाल किल्ला आमच्या पूर्वजांचा असून, तो माझ्या ताब्यात द्यावा, अशी मागणी करणारी मुघल वंशजाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिका दाखल करण्यात १५० वर्षं का लागली, असा प्रश्‍न विचारत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.
सुल्ताना बेगम यांनी ही याचिका दाखल केली होती. शेवटचे मुघल बादशाह बहादूर शाह जफर यांच्या त्या वंशज आहेत. बहादूर शाह जफर यांचे वंशज मिर्झा बख्त यांच्या त्या पत्नी आहेत. मिर्झा यांचे निधन १९८० मध्ये झाले आहे.
सुल्ताना बेगम यांनी याचिकेत म्हटले आहे की, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने १८५७ मध्ये लाल किल्ला ताब्यात घेतला. त्यामुळे आमच्या मालमत्तेच्या हक्कावर गदा आली. त्यामुळे लाल किल्ला पुन्हा आमच्या ताब्यात देण्यात यावा.
न्या. रेखा पिल्लई यांनी, गेल्या १५० वर्षांत या संदर्भात काहीच प्रयत्न का झाले नाहीत, असे म्हणत त्यांनी ही याचिका फेटाळून लावली. बेगम या अशिक्षित असल्याने त्यांनी वेळेत याचिका दाखल केली नव्हती, अशी बाजू याचिकाकर्त्यांनी मांडली.
बेगम यांनी कोणतीही वंशावळ दिलेली नाही. बहादूर शाह जफर यांचे १८५७च्या युद्धानंतर काय झाले, ते सर्वांना माहिती आहे, त्यांच्या वंशजांनी लाल किल्ला परत मिळवण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. आता बेगम सुल्ताना अशी मागणी करू शकतात का, असा प्रश्‍नही न्यायालयाने विचारला.

Posted by : | on : 21 Dec 2021
Filed under : दिल्ली, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g