किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादललसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचे छायाचित्र,
तिरुवनंतपुरम्, २१ डिसेंबर – गेल्या वर्षभरापासून देशभरात व्यापक प्रमाणावर लसीकरणाची मोहीम सुरू आहे. मात्र, लसीकरण झाल्यानंतर मिळणार्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र आणि संदेशावर काहींनी तीव्र आक्षेप घेतला. याच अनुषंगाने मोदींचा फोटो हटविण्याची विनंती करणारी याचिका केरळ उच्च न्यायालयाने फेटाळताना याचिकाकर्त्याला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.
उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू होती. यावर आज मंगळवारी न्यायालयाने आपला निर्णय दिला. ही याचिका म्हणजे न्यायालयाचा वेळ वाया घालवण्याचा प्रकार असून, ती राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले. अशा प्रकारच्या याचिका दाखल करण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी एक लाखांचा दंड ठोठावण्यात येत असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले.
भारतीय नागरिकाकडून हे अपेक्षित नाही
अशी याचिका देशाच्या नागरिकाकडून अपेक्षित नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याचिकाकर्त्याचा यात खोडसाळपणा दिसून येत आहे. पंतप्रधानांचा फोटो आणि त्यांचा सामाजिक संदेश यावर आक्षेप घेणे एका भारतीय नागरिकाकडून अपेक्षित नाही. आज न्यायालयांमध्ये हजारो प्रकरणे प्रलंबित असताना अशा प्रकारच्या याचिका करणे म्हणजे न्यायालयाचा वेळ वाया घालवणे आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाचा वेळ वाया घालवणार्या याचिका स्वीकारल्या जाणार नाहीत, हा संदेश लोकांमध्ये आणि समाजात जावा, यासाठी हा दंड ठोठावण्यात आला आहे, असे न्यायालयाने सांगितले. दिलेल्या मुदतीत याचिकाकर्त्याने दंड न भरल्यास, त्याच्या मालमत्तेच्या जप्तीमधून तो वसूल करावा, असा आदेश न्यायालयाने प्रशासनाला दिला.
याचिकाकर्ते पीटर म्यालिपरम्पिर यांनी पंतप्रधानांच्या छायाचित्राशिवाय लस प्रमाणपत्र देण्याची मागणी केंद्राकडे केली होती. त्यांना सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. लसीच्या दोन्ही मात्रांसाठी आपण पैसे मोजले आहे. त्यामुळे लस प्रमाणपत्र ही आपली खाजगी बाब आहे. त्यावर माझी वैयक्तिक माहिती आहे. त्यामुळे या खाजगी बाबीत कोणतेही अतिक्रमण होणे योग्य नाही, असे पीटर यांचे म्हणणे होते.