किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 23.32° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादल– अयोध्येत आपले राम आले,
अयोध्या, (२२ जानेवारी) – प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने रविवारी मी रामसेतूच्या प्रारंभ बिंदूवर होतो. प्रभू श्रीराम समुद्र ओलांडून जाण्यास निघाले, त्या क्षणी कालचक्र फिरले होते. आता कालचक्र पुन्हा शुभ दिशेने फिरणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर ते उपस्थितांना संबोधित करीत होते.
कित्येक शतकांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत आपले राम आले आहेत. शतकांपासून ठेवलेले अभूतपूर्व धैर्य, कित्येकांनी दिलेली प्राणांची आहुती, त्याग आणि तपस्येनंतर प्रभू श्री रामचंद्रांचे आगमन झाले आहे. या शुभप्रसंगी आपल्या सर्वांचे, देशवासीयांचे मी अभिनंदन करतो. गर्भगृहातील ईश्वरीय चेतनेचा अनुभव घेऊन मी तुमच्यासमोर आलो, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
सांगण्यासाठी खूप काही आहे. मात्र, कंठ दाटून आला आहे, शरीर स्पंदित आहे. चित्त त्या क्षणात रममाण आहे. आपले रामलला आता तंबूत राहणार नाही. ते भव्य मंदिरात राहतील. जे घडले त्याची अनुभूती देश आणि जगातील प्रत्येक कोपर्यातून आलेल्या भाविकांना असेल, याचा मला विश्वास आहे, अपार श्रद्धा आहे. हा क्षण अतिशय पवित्र आहे. हे वातावरण, हा क्षण प्रभू श्रीरामाचे आम्हा सर्वांवर आशीर्वाद आहे.
दैवीय आशीर्वाद आणि दिव्य आत्मांमुळे हे कार्य पूर्ण झाले. या सर्व दिव्य चेतनांना मी नमन करतो. आमचा पुरुषार्थ, त्याग, तपस्येत काही मकतरता राहिली असेल म्हणूनच इतक्या शतकांपासून हे कार्य करू शकलो नव्हतो. आज ते पूर्ण झाले आहे. प्रभू श्रीराम आज आपल्याला माफ करतील, यावर माझा विश्वास आहे. दीर्घकाळापासून आलेली आपत्ती आता संपुष्टात आली, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
अनेक पिढ्यांनी सहन केला वियोग
त्रेतायुगात केवळ १४ वर्षांचा वियोग सहन होऊ शकला नाही. या युगात अयोध्या आणि देशवासीयांना शेकडो वर्षांचा वियोग सहन केला आहे. आपल्या कित्येक पिढ्यांनी हा वियोग सहन केला आहे. भारताच्या घटनेच्या पहिल्या प्रतीत भगवान राम विराजमान आहेत. संविधान अस्तित्वात आल्यानंतर कित्येक दशकांपर्यंत प्रभू श्री रामाच्या अस्तित्वाबाबत कायदेशीर लढाई लढली गेली. न्यायाची लाज राखणार्या न्यायपालिकेचे मी आभार व्यक्त करेल. त्याचप्रमाणे प्रभू रामाचे मंदिरही न्याय्य पद्धतीने बांधण्यात आले होते.
राम आग नव्हे, देशाची ऊर्जा
राम मंदिर झाले तर आग लागले, असे एका काळात काही लोक म्हणायचे. भारताच्या सामाजिक भावाचे पावित्र्य त्या लोकांना माहीत नव्हते. राम मंदिराची निर्मिती भारतीय समाजातील शांती, धैर्य, सद्भावनेचे प्रतीक आहे. या निर्मितीतून कोणतीही आग नव्हे तर, ऊर्जेला जन्म होत असल्याचे दिसत आहे. राम वाद नव्हे, समाधान आहे. राम केवळ आपले नाही, सर्वांचेच आहेत. राम वर्तमान नाही, अनंत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.