किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलअयोध्या, (२२ जानेवारी) – संकल्प केला तिथेच राम मंदिर उभारले, असा सिंहनाद उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी येथे झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर केला. हे केवळ राम मंदिर नव्हे, तर राष्ट्र मंदिर आहे.
देशातील बहुसंख्य समाजाने आपल्या आराध्य दैवतासाठी इतका दीर्घकाळ लढा दिल्याचे श्री राम जन्मभूमी हे एक अनोखे उदाहरण आहे, असे त्यांनी सांगितले. आज माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा क्षण आहे. रामजन्मभूमी मुक्तीच्या संकल्पामुळे मला गुरुदेव राष्ट्रसंत ब्रह्मलीन महंत श्री अवेद्यनाथ यांची साथ लाभली. श्री रामजन्मभूमी मुक्ती महायज्ञ केवळ एक सनातन आस्था आणि विश्वासाची परीक्षाच ठरला नाही, तर संपूर्ण देशाला सनातन आस्था आणि एकात्मतेच्या सूत्रात बांधणार्या सामूहिक चेतना जागृतीचे उद्दिष्टही पूर्ण झाले. राम मंदिराची स्थापना हा भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचा अध्यात्मिक संस्कार आहे, ते एक राष्ट्र मंदिर आहे. निश्चितच श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा हा एक राष्ट्रीय गौरवाचा ऐतिहासिक प्रसंग आहे, असे आदित्यनाथ यांनी सांगितले.
शपथ घेतली तिथेच मंदिर उभारले, याचा आम्हाला अभिमान आहे. ५०० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आलेल्या भगवान श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या ऐतिहासिक आणि अत्यंत पवित्र प्रसंगी आज संपूर्ण भारत भावूक झाला आहे. अयोध्येत विराजमान झालेले रामलला हे भारतातील रामराज्याच्या स्थापनेची उद्घोषणा आहे, असे योगी यांनी सांगितले.
अयोध्येत आता गोळीबार होणार नाही
रामकृपेने आता कुणीही येऊन अयोध्या धाम येथे पारंपरिक परिक्रमा करू शकेल. येथील गल्ल्यांमधून गोळीबार होणार नाही, शरयू नदी रक्तरंजित होणार नाही, अयोध्येत संचारबंदी लागणार नाही. येथे उत्सव असेल, रामनाम संकीर्तन गुंजायमान होईल. प्रत्येकाच्या मनात समाधान आणि आनंद आहे. प्रत्येक मार्ग श्री रामाच्या दिशेने जात असल्याचे आदित्यनाथ यांनी सांगितले.