किमान तापमान : 24.28° से.
कमाल तापमान : 24.86° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 66 %
वायू वेग : 2.52 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.28° से.
23.99°से. - 27.79°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल25.13°से. - 28.46°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल25.09°से. - 28.76°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.94°से. - 28.38°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.26°से. - 28.45°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.39°से. - 27.44°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलनवी दिल्ली, ४ जानेवारी – हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी झाल्याने सोमवारी रस्ता वाहतूक आणि विमानसेवा बंद ठेवण्यात आली. राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये शनिवार आणि रविवारी झालेल्या पावसामुळे थंडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, राजधानीत आज सकाळी दाट धुके दिसून आले. हवामान विभागाने उद्या मंगळवारीही अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे.
माहितीनुसार, काश्मीर खोर्यातील अनेक ठिकाणी रविवारी रात्री आणि आज सकाळी बर्फवृष्टी झाली. त्यामुळे श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक आणि श्रीनगर विमानतळावरील उड्डाणे थांबवण्यात आली. श्रीनगरमध्ये तीन ते चार इंच, तर दक्षिण काश्मिरातील काजीगुंड येथे ९ इंच बर्फवृष्टी झाली. तसेच, जवाहर सुरुंग परिसरात १० इंच बर्फवृष्टीची नोंद झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. कडाक्याच्या थंडीसह दिल्लीतील अनेक भागात आज सलग तिसर्या दिवशीही पाऊस कोसळला. पुढील २४ तासांत अवकाळी पाऊस आणि थंडीची लाट अपेक्षित आहे. तसेच, ७ जानेवारीनंतर तापमान कमी होत थंडीत वाढ होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, देशाच्या उत्तर भागात उद्या मंगळवारपर्यंत विजेच्या कडकडाटासह दमदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मैदानी भागातील पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानसह पश्चिम हिमालयीन क्षेत्रातील जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये थंडीची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.