किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलप्रज्ञान भारती योजनेंतर्गत २२ हजार दुचाकींचे वाटप, आसाम सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय,
गुवाहाटी, ५ जानेवारी – मुलींना शाळेत जाण्यासाठी आणि त्यांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज असते. हे लक्षात घेऊन मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आसाम सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आसाममध्ये शाळेत जाणार्या प्रत्येक विद्यार्थिनीला वर्गामध्ये येण्यासाठी दररोज १०० रुपये मिळणार आहेत. भाजपाप्रणीत आसाम सरकारच्या या निर्णयाचे समाज माध्यमांवर कौतुकही होत आहे.
मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत आहे, असे आसामचे शिक्षणमंत्री हिमंत बिस्वा सरमा वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
याचबरोबर, चालू महिन्याच्या अखेरीस दिवसाला १०० रुपयांची योजना सुरू केली जाईल. इतकेच नाही, तर राज्य सरकार १२ वीची शिक्षण मंडळाची परीक्षा उत्तीर्ण होणार्या मुलींना प्रज्ञान भारती योजनेंतर्गत २२ हजार दुचाकींचे वाटप करणार आहे, असेही शिक्षणमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले.
या योजनेसाठी १४४.३० कोटी रुपये खर्च केले जातील. राज्य बोर्डातून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थिनींना सरकार स्कूटर भेट देणार आहे. जर विद्यार्थिनींची संख्या एक लाखाच्या पुढे गेली असेल तरीही सरकार त्यांना स्कूटर देणार आहे. २०१८ आणि २०१९ मध्ये प्रथम श्रेणीत इयत्ता १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थिनींनादेखील स्कूटर दिली जाणार आहे, असेही हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले.
पदवी व पदव्युत्तर विद्यार्थिनींनाही मदत
शिक्षणमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीअखेरपर्यंत पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थिनींच्या बँक खात्यात १५०० आणि २ हजार रुपये जमा केले जातील. ही रक्कम त्यांच्या पुस्तक आणि इतर अभ्यास सामग्री इत्यादींच्या खरेदीसाठी उपयुक्त ठरेल. गेल्या वर्षी सरकार या दोन्ही आर्थिक प्रोत्साहन योजना सुरू करणार होती, परंतु कोरोनामुळे सुरू होऊ शकली नाही. आता सरकार तातडीने या योजनेची अंमलबजावणी २०२१ पासून सुरू करणार आहे.