किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलगाझियाबाद, ४ जानेवारी –
उत्तरप्रदेशमधील गाझियाबाद जिल्ह्यातील मुरादनगर येथे स्मशानभूमीतील शेडचे छप्पर कोसळून झालेल्या घटनेतील मृतांची संख्या २५ झाली असून आतापयर्र्त ३ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्यांनी दिली.
रविवारी सकाळी ही भीषण दुर्घटना घडली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेस जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबास दोन लाख रुपये मदतीची घोषणा योगी आदित्यनाथ सरकारने केली आहे. गाझियाबादला मेरठशी जोडणार्या राष्ट्रीय महामार्गावर संतप्त झालेल्या मृतांच्या नातेवाईकांनी मृतदेह ठेवून रास्ता रोको केला. यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने दोन सदस्यांची चौकशी समिती गठित केली गेली आहे, अशी माहिती गाझियाबाद ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांनी दिली.
धक्कादायक बाब म्हणजे स्मशानभूमीच्या शेडचे छप्पर चार महिन्यांपूर्वीच नव्याने बांधण्यात आले होते. छत बांधण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे एनडीआरएफने सांगितले.