किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल१२ वर्षीय मुलाचा बळी,
केरळ, ५ सप्टेंबर – देशात कोरोनाचे संकट असताना आता निपाह विषाणूचा शिरकाव झाला असून, जिवघेण्या निपाह विषाणूची लागण झालेल्या केरळमधील १२ वर्षीय मुलाचा बळी गेला आहे.
३ सप्टेंबर रोजी १२ वर्षीय निपाह संशयित मुलाला कोझिकोड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या मेंदूला सूज आलेली अन् हृदयस्नायूचा दाह असा त्रास होत होता. या मुलात निपाह विषाणू संसर्गाची लक्षणे दिसून येत होती. आज रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारने दिली आहे.
या घटनेनंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय रोग नियंत्रण पथक तातडीने केरळला पाठवले. केरळ सरकारकडून या पथकाला योग्य ती मदत पुरवली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोझिकोड येथे उद्भवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी पथक नेमण्यात आल्याची माहिती केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली. निपाह विषाणूची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत तसेच संपर्कातील लोकांना विलगीकरणात ठेवले जाईल. यावर काम सुरू करण्यात आले आहे. निपाह विषाणू आढळला म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. आपण सावधगिरी बाळगायला हवी, असे जॉर्ज म्हणाल्या.
निपाह विषाणू साधारणपणे वटवाघळात आढळून येतो. हा विषाणू माणसांसाठी धोकादायक समजला जातो. एका वृत्तसंस्थेने यासंदर्भातील शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. देशात आतापर्यंत निपाह विषाणूचा चारवेळा उद्रेक झाला आहे. या विषाणूवर अद्याप कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. याशिवाय या विषाणूची लागण झाल्यास मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. कोरोनाची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता १ ते २ टक्के असते, पण निपाह विषाणूची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता ६५ ते १०० टक्के असते. त्यामुळेच या विषाणूचा धोका जास्त आहे.
केंद्राचे राज्य सरकारला निर्देश
केरळ राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या वाढत्या बाधितांमुळे केंद्र सरकार आधीच चिंतेत आहे. निपाह विषाणूने आणखी केंद्राच्या चिंतेत वाढ केली आहे. याच पृष्ठभूमीवर केंद्राने केरळमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक पथक पाठवले आहे. सोबतच निपाह विषाणूबाबत राज्यसरकारला आवश्यक ती पावले उचलण्यास सांगितले आहे.